मुळशी तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम

खडकवासला : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव अंतर्गत पुणे जिल्हा परिषद, पंचायत समिती मुळशी शिक्षण विभाग यांच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव व विद्यार्थ्यांना आनंददायी प्रोत्साहन देणार्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी जवळ गावच्या नवनिर्वाचित सरपंच उज्ज्वला घा, उपसरपंच स्वाती केमसे, सामाजिक कार्यकर्ते नीलेश घा, व्यवस्थापन समिती अध्यक्ष रमेश शिंदे, उपाध्यक्षा मीनाक्षी घा, नाना घा, जयसिंग घा उपस्थित होते.
स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव शाळास्तरीय स्पर्धानिमित्त वक्तृत्व स्पर्धा, निबंधलेखन स्पर्धा, वेशभूषा स्पर्धा, चित्रकला स्पर्धा इत्यादी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. वेशभूषा स्पर्धेत कोणी क्रांतिवीर, देशभक्त, विविध व्यावसायिक, जसे की दूधवालेकाका, जगाचा पोशिंदा शेतकरी, डॉक्टर, भारतमाता इत्यादी भूमिका साकारत विद्यार्थ्यांनी उपस्थितांना जनजागृतीपर संदेश दिले. स्पर्धेचे आयोजन व यशस्वीतेसाठी उपक्रमशील शिक्षक किशोर बेलदार, मुख्याध्यापक जालिंदर चौधरी यांनी परिश्रम घेतले. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, नाना घा, रमेश घा, शोभा घा, निशा घा, रुपाली सुपेकर, अश्विनी घा, रुपाली सुनील सुपेकर, शिंदेताई, अश्विनी घा व पालक उपस्थित होते.