ताज्या बातम्यामनोरंजन

“…म्हणून मी ट्विटरवर नाही”, बाॅयकाॅट ट्रेंडवर करीना कपूरचं स्पष्टीकरण

मुंबई | Kareena Kapoor Khan Reacts On Boycott Trend – बाॅलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री करीना कपूर खान सध्या तिच्या ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटामुळे चर्चेत आली आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने आमिर खान आणि करीना कपूर ही जोडी पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर एकत्र दिसणार आहे. तसंच गेल्या काही दिवसांपासून ‘बॉयकॉट लाल सिंग चड्ढा’ हा ट्रेंड सोशल मीडियावर चर्चेत आहे. त्यामुळे हा चित्रपट प्रदर्शनाआधीच चर्चेचा विषय ठरत आहे. यावर आता करीना कपूरने स्पष्टीकरण दिलं आहे.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत करीनाने बाॅयकाॅट ट्रेंडवर भाष्य केलं आहे. “दरदिवशी सेलिब्रिटी ट्रोल होत असतात. त्यामुळे मी ट्विटरवर नाहीये. ज्यांना उगाच आपल्या भावना व्यक्त करायच्या असतात, ते ट्विटरवर असतात. मला यावर वेळ वाया घालवायचा नाही. मी माझ्या मुलांसोबत, कुटुंबासोबत वेळ घालवते, त्यात मला आनंद मिळतो”, असं करीनाने म्हटलं आहे.

दरम्यान, ‘लाल सिंह चड्ढा’ हा चित्रपट टॉम हँक्सच्या ‘फॉरेस्ट गंप’ हॉलीवूड चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. करीना चित्रपटाबद्दल म्हणाली, “जगात सगळ्यांनी ‘फॉरेस्ट गंप’ हा चित्रपट पाहिला नसेल. जे लोक इंग्रजी बोलत नाहीत ते या कथेसाठी नक्की चित्रपट पाहतील. हा चित्रपट तामिळ आणि तेलगूमध्ये सुद्धा प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे लोकांना त्यांच्या भाषेत चित्रपट पाहता येईल.”

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये