शिंदे नेमका कोणाचा बळी देण्यासाठी गुवाहाटीला चाललेत? अजित पवारांचा खोचक सवाल

पुणे : (Ajit Pawar On Eknath Shinde) महाविकास आघाडी सरकार पाडल्याचा नवस फेडण्यासाठी, कामाख्या देवीच्या दर्शनाला बाळासाहेबांचे शिवसेना पुन्हा एकदा गुहाटीला जाणार असल्याची जोरदार राजकीय चर्चा सुरू आहे. त्यांच्या या दौऱ्या विषयी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मिश्किल टिप्पणी केली.
कामाख्या देवीला तिथे रेड्याचा बळी दिल्या जातो. नेमकं कोणाचा बळी देण्यासाठी गुवाहाटीला चालेल आहेत? असा खोचक सवाल विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी एकनाथ शिंदेसह त्यांच्या आमदारांना केला आहे.
काही ठिकाणी बोकडाचा बळी दिल्या जातो. काही ठिकाणी कोंबड्यांचा बळी दिला जातो आणि मला असं कळालं आहे की तिथे रेड्याचा बळी दिल्या जातो. आता कोणाचा बळी देण्यासाठी ते तिथे चालले आहेत आपण बघूया. लोक नवस फेडायला जात असतात, दर्शनाला जात असतील तर त्यांना शुभेच्छा, असं अजित पवार म्हणाले.