ताज्या बातम्यामनोरंजन

भावाचा नादच खुळा! एमसी स्टॅनची बाॅलिवूडमध्ये एन्ट्री, शाहरूख खानसोबत दिसणार चित्रपटात

मुंबई | MC Stan – ‘बिग बाॅस 16’चा (Bigg Boss 16) विजेता पुण्याचा रॅपर एमसी स्टॅन (MC Stan) ठरला. त्यानंतर एमसी स्टॅनच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली आहे. त्याचे चाहतेही लाखोंच्या संख्येत आहेत. तसंच एमसी स्टॅनला अनेक ऑफर येतानाही दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच त्याला बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक साजिद-वाजिदनं (Sajid- Wajid) चित्रपटात गाणं ऑफर केल्याची चर्चा होती. त्यानंतर आता स्टॅन बाॅलिवूडचा किंग शाहरूख खानसोबत (Shah Rukh Khan) चित्रपटात दिसणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत.

एमसी स्टॅनला अनेक ब्रॅण्डकडून जाहिरातींच्या ऑफर आल्या आहेत. तसंच संगीत दिग्दर्शक साजिद-वाजिदनं स्टॅनला चित्रपटात गाणं ऑफर केलं असून त्याचे साजिद-वाजिदबरोबरचे फोटोही व्हायरल झाले होते. त्यानंतर आता स्टॅन बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर सुरू आहेत. स्टॅन शाहरुख खानच्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचं म्हटलं जातंय.

एका फॅन पेजवरुन एसमी स्टॅनच्या बाॅलिवूड पदार्पणाबाबत ट्विट करण्यात आलं आहे. ‘जवान’ (Jawan) या चित्रपटाच्या निर्मात्यांनी स्टॅनशी संपर्क साधल्याचं या ट्विटमध्ये म्हटलं गेलं आहे. परंतु, अद्याप याबाबत चित्रपटाच्या टीमनं आणि स्टॅननं कोणतीही ऑफिशिअल माहिती दिलेली नाही. दरम्यान, स्टॅनच्या बाॅलिवूड पदार्पणामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.

https://twitter.com/AskJagruk/status/1630807834052136961

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये