राजकीय भूकंप होणार? ‘मी पुन्हा येईन’ भाजपकडून देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ ट्विट अन् अवघ्या काही तासातच डिलीट

मुंबई | Devendra Fadnavis | सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे. कारण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा एक व्हिडीओ भाजपच्या (BJP) अधिकृत ट्विटर अकाउंटवर ट्विट करण्यात आला होता. या व्हिडीओनंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. त्यामुळे अवघ्या काही तासातच हा व्हिडीओ भाजपकडून डिलीट करण्यात आला.
भाजपच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर देवेंद्र फडणवीसांचा एक व्हिडीओ ट्विट करण्यात आला होता. या व्हिडीओमध्ये देवेंद्र फडणवीस ‘मी पुन्हा येईल’ ही कविता म्हणाताना दिसत होते. या व्हिडीओमुळे फडणवीस पुन्हा राज्याचे नवे मुख्यमंत्री होणार का? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे अवघ्या 55 मिनिटांमध्ये भाजपने तो व्हिडीओ डिलीट केला.
2019 च्या विधानसभा निवडणुकीआधी देवेंद्र फडणवीसांनी विधी मंडळाच्या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभेमध्ये एक कविता म्हटली होती. ‘मी पुन्हा येईल’ ही कविता फडणवीसांनी म्हटली होती. त्यावेळी त्यांची ही कविता सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली होती.
दरम्यान, आता पुन्हा एकदा फडणवीसांचा हा व्हिडीओ ट्विट करण्यात आल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. तसंच आता मोठा राजकीय भूकंप होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.