देश - विदेश

‘इंडिया’ आघाडीची मूठ बांधली? मुंबईत होणाऱ्या बैठकीची जय्यत तयारी, कार्यक्रमाची A टु Z माहिती..

मुंबई : (Mumbai INDIA Meeting) भाजप आणि मोदी सरकारविरोधात विरोधकांनी एकत्रित येऊन ‘इंडिया’ आघाडीची मूठ बांधली. पाटणा, बंगळुरुनंतर आता मुंबईत विरोधकांच्या इंडिया आघाडीची (Opposition Meeting) बैठक होणार आहे. या पार्श्वभुमीवर मुंबईत (Mumbai) जय्यत तयारी करण्यात येत आहे. येत्या 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर या दोन दिवशी इंडिया आघाडीची बैठक पार पडणार आहे.

महाविकास आघाडीतील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस गट आणि काँग्रेस हे तिन्ही पक्षाच्या समन्वयाने मुंबईतील ग्रँड हयात या पंचतारांकित हॉटेलमध्ये या बैठकीचे आयोजन करण्यात आलं आहे. या बैठकीच्या आयोजनाची मुख्य जबाबदारी, यजमान पद हे शिवसेनेकडे देण्यात आली आहे. राष्ट्रवादी पक्षाकडे इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी येणाऱ्या नेत्यांच्या स्वागताची जबाबदारी देण्यात आली आहे.

मुंबईत होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीचा कार्यक्रम असा असेल
30 ऑगस्ट रोजी दुपारी 4 वाजता महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व काँग्रेसचे महत्त्वाचे नेते उपस्थित राहतील.

31 ऑगस्ट – सायंकाळी सहा ते साडेसहा
देशातील इंडिया आघाडीमधील पक्षातील नेत्यांचं मुंबईतील ग्रँड हयात हॉटेल मध्ये स्वागत केले जाणार
31 ऑगस्ट – साडे सहानंतर पुढे
इंडिया आघाडीच्या लोगोच्या अनावरण
अनौपचारिक बैठक
31 ऑगस्ट – रात्री आठ वाजता
1 सप्टेंबर – सकाळी 10 वाजता
इंडिया आघाडीतील विविध पक्षांच्या प्रतिनिधींचा ग्रुप फोटोसेशन
1 सप्टेंबर – सकाळी साडे 10 ते दुपारी 2 वाजता
इंडिया आघाडीतील सर्व पक्षातील प्रतिनिधींची महत्त्वाची बैठक पार पडणार*
1 सप्टेंबर – दुपारी 2 वाजता
महाराष्ट्र काँग्रेसकडून इंडिया आघाडीतील नेत्यांसाठी खास दुपारच्या जेवणाचे आयोजन
1 सप्टेंबर – दुपारी साडेतीन वाजता
इंडिया आघाडीच्या सर्व नेत्यांची संयुक्त पत्रकार परिषद

बैठकीसाठी हयात हॉटेलमधील 175 खोल्या नेत्यांसाठी बुक केल्या आहेत. विविध राज्यातून 60 ते 65 नेते बैठकीला राहणार उपस्थित राहणार आहेत. इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी येणाऱ्या नेत्यांचं महाराष्ट्रीयन पद्धतीने स्वागत केलं जाईल. तुतारी, नाशिक ढोलने नेत्यांचे स्वागत होणार आहे. 31 ऑगस्ट रोजी होणाऱ्या डिनरमध्ये महाराष्ट्रीयन पदार्थांची रेलचेल असेल. पुरणपोळी, झुणका भाकर ते वडा पाव असे मराठी पदार्थ देशभरातील नेत्यांसाठी मेन्यूमध्ये असतील.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये