ताज्या बातम्यारणधुमाळी

“…त्यामुळे महाविकास आघाडीतही फूट पडू शकते”, संजय राऊतांचं सूचक वक्तव्य

मुंबई | Sanjay Raut – काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. राहुल गांधींनी केलेल्या विधानानंतर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. यामध्ये शिवसेनेनं देखील राहुल गांधींच्या विधावानर आक्षेप घेतला आहे. वीर सावरकर यांच्याबद्दल राहुल गांधींनी केलेल्या वक्तव्याशी आम्ही सहमत नसल्याचं, शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी म्हटलं आहे.

सावरकरांविषयी केलेलं वक्तव्य चुकीचं असून ते शिवसेनेला मान्य नाही, शिवसेना ते सहन करणार नाही. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला (Bharat Jodo Yatra) देशभरात चांगला प्रतिसाद मिळत असून महाराष्ट्रात सगळ्यात जास्त प्रतिसाद मिळाला. मात्र, या यात्रेत वीर सावरकर यांचा विषय काढण्याची काही गरज नव्हती. हा विषय काढल्यामुळं फक्त शिवसेनेलाच धक्का बसला नाही तर महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनाही धक्का बसला आहे. यामुळं महाविकास आघाडीतही फूट पडू शकते, असं संजय राऊत म्हणाले.

पुढे ते म्हणाले, इतिहासकाळात काय घडलं आणि काय नाही घडलं यापेक्षा नवा इतिहास निर्माण करावा या मताचे आम्ही आहोत. राहुल गांधींनी याकडं लक्ष द्यायला हवं. वीर सावरकरांना भारतरत्न द्यावा ही आमची मागणी आहे. सातत्यानं आम्ही ही मागणी करत आहोत. मला कळत नाही भाजपमध्ये जे नवीन सावरकर भक्त निर्माण झाले आहेत ते सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी का उचलून धरत नाहीत? असा सवालही राऊतांनी केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये