ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

पटोले-थोरात वादामुळे काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप! का उफाळला वाद, ‘ही’ आहेत पडद्यामागची कारणे

मुंबई : (Nana Patole On Balasaheb Thorat) महाराष्ट्र काँग्रेसमध्ये सध्या जे सुरुय ते अतिशय अनपेक्षित असंच आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) हे त्यांच्या रोखठोक स्वभावामुळे ओळखले जातात. दुसरीकडे काँग्रसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) हे त्यांच्या संयमी स्वभावामुळे ओळखले जातात. दोन्ही नेते हे त्यांच्या जागेवर अतिशय प्रतिष्ठावंत आहेत. पण याच दोन बड्या नेत्यांमध्ये वाद उफाळल्याने काँग्रेसमध्ये सारं काही आलबेल नाही, हे स्पष्ट झालंय. यांच्या याच वादातील इनसाईड स्टोरी आता समोर आली आहे. “सत्यजीतसाठी मी दिल्लीच्या सगळ्या वरिष्ठ नेत्यांशी बोललो. सत्यजीतला पाठिंबा देण्यास सर्वांची तयारी होती. मात्र अचानक शेवटच्या दिवसांत राजकारण झालं. मला अंधारात ठेवून सगळं केलं गेलं”, असा आरोप बाळासाहेब थोरातांनी केलाय.

सत्यजीत तांबे माझ्या घरातले आहेत. राजकारणात नाते जपणं अत्यंत महत्त्वाचं असतं. सत्यजीतसाठी मी दिल्लीतील ज्येष्ठ नेत्यांशी बोललो. सत्यजीतला पाठिंबा देण्यासाठी सगळे तयार होते. मात्र अचानक शेवटच्या दिवसात राजकारण झालं मला अंधारात ठेवून राजकारण केलं. एच के पाटील यांनाही अंधारात ठेवलं गेलं अशी शंका आहे. नाराजीचं पत्र लिहिल्यावर मला दिल्लीतून फोन आले. माझ्या नाराजीबद्दल दिल्लीतून विचारणा केली गेली.

आयुष्यात कधी गलिच्छ राजकारण केलं नाही. बाळासाहेब थोरात यांचा राजीनामा आलेला नाही. ज्या पद्धतीचं राजकारण सुरु आहे तसं राजकारण मी कधी केलेलं नाही. मी सर्वसामान्य घरातून राजकारणात आलेलो आहे. या पद्धतीचं आडवं-उभं राजकारण मला जमलं नाही. या प्रकरणातून मला खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. विधान परिषदेच्या निवडणुकीत जसं गलिच्छ राजकारण करण्यात आलं तसं मी नाही करत. तसं मी माझ्या जीवनात करणारही नाही. बाळासाहेब यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा! बाळासाहेबांनी राजीनामा दिला असं तुम्ही लोकं बोलत आहात. पण अजून तसा कुठल्याही राजीनाम्याची माहिती आलेली नाही

“सत्यजीत तांबे यांनी उमेदवारी मागितलीच नव्हती. स्वत: बाळासाहेब थोरात आमच्या पार्लमेंट्री बोर्डात आहेत. त्यांनीदेखील हा विषय काढला नाही”, असं नाना पटोले यांनी सांगितलंय. “मी सुरुवातीलाच यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता. हा कुटुंबातला वाद आहे. तो पक्षावर येऊ देऊ नका. त्यामुळे आम्ही कालपर्यंत सोबत चांगलं काम करत होतो. आताच त्यांना काय प्रोब्लेम झाला? मला माहिती नाही. पण असा प्रोब्लेम होऊ शकत नाही. त्यांचं कुठलं पत्र मिळालेलं नाही”, अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये