“शिंदे- फडणवीस दुपारचं जेवण मुंबईत करतात अन् रात्री…”, नाना पटोलेंचा टोला

मुंबई | Nana Patole On Shinde-Fadanvis Government – सध्या राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. तसंच एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार राज्यात स्थापन झालं आहे. मात्र या सरकारवर मंत्रिमंडळ विस्तार, दिल्ली दौरे अशा अनेक गोष्टींमुळे टीका केली जात आहे. यामध्ये आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे.
नाना पटोले यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे की, सरकार येऊन आता 27 दिवस झाले, हे सरकार कायदेशीर चाकोरीत आहे. महाशक्ती कोण हे आता दिसून येतंय. आपले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री रात्री जेवायला दिल्लीत जातात आणि दुपारचं जेवण मुंबईत करतात. सरकार आहे की नाही, अशी परिस्थिती निर्माण झालीये.
पुढे नाना पटोले म्हणाले, चंद्रकांत पाटलांच्या पोटात जे होतं ते ओठावर आलंय. भाजपने एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद देऊन त्यांच्यावर उपकार केलेत. एकनाथ शिंदेंना येणाऱ्या काळात कळेल आणि पश्चाताप होईल.