ताज्या बातम्यामुंबई
मुंबईत मोदी-बाळासाहेबांच्या ‘त्या’ पोस्टर्सची चर्चा…

मुंबई | विकासकामांच्या भूमिपुजनानिम्मित पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज मुंबई दौऱ्यावर आहेत. तसेच काही विकास कामांचं लोकार्पणही करण्यात येणार आहे. मात्र मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर गिरगावमध्ये अज्ञातांकडून काही पोस्टरबाजी करण्यात आली आहे, या पोस्टरवरील फोटो मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बाळासाहेब ठाकरेंसमोर झुकलेले दिसून येत आहेत. या पोस्टर्सची सर्वत्र जोरदार चर्चा रंगली आहे.

नरेंद्र मोदींच्या आजच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी हे बॅनर्स लावण्यात आले आहेत. मात्र, नरेंद्र मोदी आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या पोस्टरवर कुणाच्याही नावाचा उल्लेख नाही. त्यामुळे हे पोस्टर्स नेमके कुणी लावले असा प्रश्न सर्पवांना डला असून याकडे सर्वच मुंबईकरांचे लक्ष जात आहे.
