ताज्या बातम्यामनोरंजन

‘सेक्स आणि शाहरुख…’; नेहा धुपियाने 20 वर्षांपूर्वी केलेले ‘ते’ विधान पुन्हा चर्चेत

मुंबई | बॉलिवूडचा बादशाह शाहरुख (Shah Rukh Khan) खानचा ‘पठाण’ (Pathaan) हा सिनेमा 25 जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला असून रिलीजच्या तीन दिवसांत या सिनेमाने रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. त्यामुळे बॉलिवूडचा बादशाह आता खऱ्या अर्थाने बॉक्स ऑफिसवरचा बादशाह झाला आहे. पठाणच्या सिनेमाच्या यशादरम्यान अभिनेत्री नेहा धुपियाचं (Neha Dhupia) जुनं वक्तव्य पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. 2004 मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत नेहाने शाहरुखविषयी एक वक्तव्य केलं होतं. 20 वर्षानंतर ते वक्तव्य पुन्हा एकदा चर्चेत आलंय.

“एकतर सेक्स विकलं जातं किंवा मग शाहरुख खान” असे विधान नेहा धुपियाने त्यावेळी दिलेल्या मुलाखतीत केले होते. आता या विधानावरून नेहाने पुन्हा ट्विट केले आहे. त्यात तिने म्हटलं आहे, ’20 वर्षांनंतरही माझं हे वक्तव्य खरं ठरतंय. हे एखाद्या अभिनेत्याचं करिअर नाही तर किंगची सत्ता आहे.’

2004 मध्ये ‘जुली’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्या चित्रपटात नेहाने देह विक्री करणाऱ्या महिलेची भूमिका साकारली होती. याच भूमिकेवरून तिला त्या मुलाखतीत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर ती म्हणाली होती की, “जुली या चित्रपटात बरेच इंटिमेट सीन्स आहेत, ज्यामध्ये माझ्या शरीराला दाखवलं गेलं आहे. मला सेक्स सिम्बॉलच्या टॅगने काही फरक पडत नाही. जुलीमध्ये अशी भूमिका साकारून मी मल्लिका शेरावत आणि बिपाशा बासू यांना मागे टाकलं, असं लोक म्हणाले तरी मला फरक पडत नाही. पुढे ती म्हणते, “आजच्या घडीला अनेक गोष्टी वेळेनुसार बदलत आहेत. मात्र एक गोष्ट आजही जशीच्या तशी आहे, ती म्हणजे एकतर सेक्स विकलं जातं किंवा मग शाहरुख खान.”

https://twitter.com/NehaDhupia/status/1619193889822511104?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1619193889822511104%7Ctwgr%5E93774c9d0fb2209e60b812233c4126f89f5f9e2a%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fwww.tv9marathi.com%2Fentertainment%2Fneha-dhupia-said-her-20-years-old-statement-about-shah-rukh-khan-is-still-proving-true-amid-pathaan-success-and-box-office-collection-au163-862466.html

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये