माधुरी दीक्षितविषयी ते एक वाक्य Netflix ला पडलं महागात; काय आहे प्रकरण?

मुंबई | बॉलिवूडची धक-धक गर्ल माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. ती सोशल मीडियावर देखील कायम चर्चेत असते. माधुरीच्या चाहत्यांची संख्या जेवढी मोठी आहे, तेवढीच मोठी संख्या अभिनेत्रीच्या चांगल्या – वाईट काळात तिला पाठिंबा देणाऱ्यांची आहे. आता देखील एका प्रकरणी राजकीय विश्लेषकाने अभिनेत्रीची साथ दिली आहे. बिग बँग थिअरी (Big Bang Theory) या प्रसिद्ध शोमधील एका एपिसोडमध्ये माधुरी दीक्षितबाबत आक्षेपार्ह भाषेचा वापर केल्याचा आरोप राजकीय विश्लेषक मिथुन विजय कुमार (Mithun Vijay Kumar) यांनी केला आहे. या प्रकरणी मिथुन विजय कुमार यांनी नेटफ्लिक्सला (Netflix) नोटीस पाठवली आहे. शोमध्ये माधुरीविषयी आक्षेपार्ह भाषा वापरल्याचा दावा मिथुन विजय कुमार यांनी केला आहे.
बिग बँग थिअरीच्या दुसऱ्या सिझनमधील पहिल्या एपिसोडमध्ये जिम पार्सन्स यानं शेल्डम कूपर ही भूमिका साकारली आहे. जिम पार्सन्स हा शोमध्ये माधुरी दीक्षित आणि ऐश्वर्या राय यांची तुलना करतो. त्यानंतर तो माधुरीबाबत एक कमेंट करतो. या कमेंटवर आता मिथुन विजय कुमार यांनी आक्षेप घेतला आहे. नेटफ्लिक्सला नोटीस पाठवत राजकीय विश्लेषक मिथुन कुमार म्हणाले की. ‘माधुरी दीक्षितबद्दल वापरण्यात आलेले शब्द फक्त आक्षेपार्ह नाही तर बदनामीकारकही आहे.’ मिथुन कुमार यांनी नेटफ्लिक्सला एपिसोड काढून टाकण्याची विनंती देखील केली आहे. मिथुन विजय कुमार यांनी याबाबतचं एक ट्वीटही केलं आहे.