ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

“आदित्यच्या बापाचे…”, नितेश राणेंचं उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र

वर्धा | Nitesh Rane On Uddhav Thackeray – भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर निशाणा साधला आहे. पहिल्या दिवसापासून शिंदे फडणवीस सरकार (Shinde Fadnavis Government) घटनाबाह्य म्हणणाऱ्या आदित्यच्या बापाचंच पद घटनाबाह्य ठरत आहे, असं टीकास्त्र नितेश राणेंनी सोडलं आहे. ते आर्वी येथे भाजपच्या मेळाव्यात बोलत होते.

“तो पक्षप्रमुखच घटनाबाह्य असल्यानं तेव्हापासून सगळं घटनाबाह्य ठरत आहे. सर्व घटनाबाह्य करत असताना तुम्हाला सरकारवर बोलण्याचा अधिकारच राहिलेला नाही”, अशी टीका नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर केली आहे.

“धनुष्यबाण हा मुळात बाळासाहेबांच्या शिवसेनेचा आहे. ‘ईडी’ उगाच कुणाच्या घरी चहा घ्यायला जात नाही. ते माहिती मिळाल्यावर चौकशी करतात. भ्रष्टाचार नसेल तर थयथयाट करण्याची गरज नाही. महाविकास आघाडीचं सरकार असताना आमची घरे तोडली, आमच्यावर चुकीच्या केसेस लावल्या, आम्हाला अटक केली. नेत्यांना समाजमाध्यमांवरील पोस्टवरून चुकीच्या पद्धतीनं अटक केली. ते दोषी चालतात. तर मग आता ‘ईडी’ची चौकशी सुरू झाली तर थयथयाट करतात. सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयास जे योग्य वाटतं ते होतं. त्यानुसार तारखा पडतात. त्यावर बोलणं उचित नाही”, असंही नितेश राणे म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये