ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

“Master Of All…”, दिशा सालियन प्रकरणी सीबीआयने अहवाल सादर केल्यानंतर नितेश राणेंची प्रतिक्रिया

मुंबई | Nitesh Rane – अभिनेता सुशांत सिंह राजपूतची मॅनेजर दिशा सालियनच्या (Disha Salian) मृत्यूनं राज्यात एकच खळबळ उडाली होती. दिशा सालियनचा बलात्कार करून हत्या करण्यात आल्याचा दावा केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी केला होता. तसंच याप्रकरणात आदित्य ठाकरेंचं (Aditya Thackeray) नाव असल्याचा गंभीर आरोपही राणेंनी केला होता. मात्र, आता याप्रकरणात नवा खुलासा झाला आहे. दिशा सालियनचा अपघाती मृत्यू झाल्याचं सीबीआय तपासात समोर आलं आहे.

दिशा सालियन प्रकरणी सीबीआयनं अहवाल सादर केला असून तिचा अपघाती मृत्यू असल्याचं स्पष्ट केलं आहे. दारूच्या नशेत तोल गेल्यानं आणि 14 व्या मजल्यावरून पडून दिशाचा मृत्यू झाल्याचं सीबीआयनं सांगितलं आहे. तसंच हा तपास बंद केला असल्याचंही सीबीआयनं सांगितलं. दरम्यान, याप्रकरणी नितेश राणे (Nitesh Rane) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“मी सीबीआयनं नोंदवलेल्या निरीक्षणासाठी त्यांना दोष देणार नाही. 72 दिवसांनी सीबीआयकडे तपास सोपवण्यात आला होता. 8 जूनपासून महाविकास आघाडी सरकारच्या मदतीनं इतक्या चांगल्या पद्धतीनं सर्व पुरावे मिटवण्यात आले की, सीबीआयकडे तपास आला तेव्हा काहीच सापडलं नाही. Master of all cover ups!”, असं नितेश राणेंनी ट्विट करत म्हटलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये