‘…तर तोंडाला काळे फासू”, कार्तिकी एकादशीला अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांना नो एन्ट्री; सकल मराठा समाजाचा थेट इशारा

पंढरपूर | Kartiki Ekadashi : सध्या मराठा समाज राज्य सरकारविरोधात चांगलाच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. आता कार्तिकी एकादशीच्या (Kartiki Ekadashi) पार्श्वभूमीवर मराठा समाजानं थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांना इशारा दिला आहे. मराठा समाजानं कार्तिकी एकादशीला पंढरपूरमध्ये (Pandharpur) दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना एन्ट्री ने देण्याचा निर्धार केला आहे.
यंदा पंढरपूरमध्ये कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मानाचा वारकरी दाम्पत्याच्या हस्ते करण्यात येण्याचा प्रघात आहे. पण ही महापूजा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते न करत शेकऱ्याच्या हस्ते करावी, असं पत्र सकल मराठा मोर्चानं मंदिर समितीला दिले आहे.
मनोज जरांगेंनी आवाहन केल्यानंतर संपूर्ण राज्यात राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यात येत आहे. त्यामुळे मराठा समाज आक्रमक झाला असून नेत्यांना गावबंदी करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर मराठा समाजानं दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पंढरपूरमध्ये प्रवेश न देण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच कार्तिकी एकादशीची महापूजा वारकऱ्यांच्या हस्ते करा, जर आरक्षण न देता कोणी येण्याचा प्रयत्न केला तर तोंडाला काळे फासू असा इशारा सकल मराठा समाजानं दिला आहे.
