10वीच नाही तर 8वी पास उमेदवारही करु शकतात अग्निवीर भरतीसाठी अर्ज, वाचा सविस्तर
नवी दिल्ली | Agnipath Scheme 2022 – अग्निपथ योजनेवर केंद्र सरकार सैन्य भरतीसाठी ठाम आहे. आजपासून भारतीय लष्करात अग्निपथ योजनेनुसार भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यात येणार आहे. भारत सरकारच्या महत्त्वकांक्षी अग्निपथ योजनेंतर्गत अग्निवीरांच्या भरतीसाठी भारतीय लष्कराने अग्निवीर रिक्रूटमेंट रॅली नोटिफिकेशन जारी केले आहे. यानुसार, पात्र आणि इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे. इच्छुक उमेदवारांना भारतीय लष्कराची अधिकृत वेबसाइट joinindianarmy.nic.in ला भेट देऊन अर्ज करता येईल. तसंच जुलै २०२२ पासून याची नोंदणी प्रक्रिया सुरू होईल.
या पदांसाठी होणार भरती :
अग्निवीर जनरल ड्यूटी
अग्निवीर टेक्निकल (एव्हिएशन/एम्यूनेशन)
अग्निवीर क्लार्क/ स्टोअरकीपर टेक्निकल
अग्निवीर ट्रेड्समन १०वी पास
अग्निवीर ट्रेड्समन ८वी पास
किती असेल सॅलरी :
जारी करण्यात आलेल्या नोटिफिकेशननुसार, ४ वर्षांसाठी उमेदवारांची भरती केली जाईल. यादरम्यान दरवर्षी ३० दिवस सुट्टीही मिळेल. सर्विसच्या पहिल्या वर्षी ३०,०००/- रुपये एवढे वेतन आणि भत्ते, दुसऱ्या वर्षी ३३,०००/- रुपये एवढे वेतन आणि भत्ते, तिसऱ्या वर्षी ३६,५००/- रुपये एवढे वेतन आणि भत्ते तसेच शेवटच्या वर्षीही ४०,०००/- हजार रुपये वेतन आणि भत्ते दिले जातील.
पदानुसार निर्धारित पात्रता :
– जनरल ड्यूटी पदाच्या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांना दहावीला किमान ४५ टक्के मार्क असणे आवश्यक आहे.
-टेक्निकल एव्हिएशन आणि एम्यूनेशन पदासाठी फिजिक्स, केमेस्ट्री, मॅथ्स आणि इंग्रजी विषयांत किमान ५० टक्के मार्कांसह १२ वी पास होणे आवश्यक आहे. तसेच इंग्रजी आणि मॅथ्स मध्ये ५० टक्के मार्क असणे आवश्यक आहे.
-ट्रेंड्समन पदांसाठी १०वी आणि ८वी पास उमेदवारांची वेग-वेगळी भरती केली जाईल. सर्व विषयांत ३३ टक्के मार्क असणे आवश्यक आहे.
-सर्व पदांसाठी निर्धारीत वयोमर्यादा १७.५ वर्ष ते २३ वर्ष एवढी आहे.
सर्व्हिसनंतर काय मिळणार :
चार वर्ष नोकरी पूर्ण झाल्यानंतर, अग्निवीरांना सेवा निवृत्ती पॅकेज, अग्निवीर स्किल सर्टिफिकेट आणि १२वी समकक्ष पात्रता प्रमाणपत्र देखील मिळेल. तसंच जो उमेदवार १०वी पास असेल, त्याला ४ वर्षांनंतर, १२वी समकक्ष पास सर्टिफिकेट देखील मिळेल.