देश - विदेश

युतीसाठी उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना फोन? केसरकर म्हणाले“ ‘त्यांचा’ फोन तपासा…

मुंबई : (Devendra Fadnavis in Call Uddhav Thackeray) उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना फोन करुन शिंदेंना बाजूला करा, आपण युती करु अशा प्रकारची माध्यमांमध्ये चर्चा सुरु होती. मात्र, हे कितपत खरं आहे ठाकरे आणि फडणवीसच सांगू शकतील या दोघांपैकी एकनंही यावर आद्याप खुलासा केला नाही. आणि माध्यमांच्या सुत्रांनी दिलेली माहिती किती खरी असते. हे तर संपुर्ण देशालाच माहिती आहे. याच विषयावर बोलताना शिंदे गटाचे प्रवक्ते दिपक केसरकर म्हणाले, शिवसेना पक्षातील दुसऱ्या क्रमांकाचे नेते एकनाथ शिंदे आहेत जे तुम्हाला वडिलांसमान मानत आहेत त्यांच्याबद्दल असं बोलत असाल, तर आमच्यासारख्या सामान्य शिवसैनिकांचं काय होत असेल? अशी विचारणा त्यांनी केली. यावेळी त्यांनी आदित्य ठाकरेंकडून शिवसंवाद यात्रेच्या निमित्ताने होत असलेल्या टीकेवर जाहीर नाराजी व्यक्त केली.

उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना फोन केला हे खरं की, खोटं समोर येणे अपेक्षित आहे. हर्षल प्रधान यांनी हे खोटं असल्याचं सांगत सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. मात्र, केसरकर म्हणाले, तसं असेल तर अनिल परब यांचा फोन तपासला पाहिजे, त्यांच्या फोनमधून फडणवीसांना फोन गेला असेल, तर नक्की तसं घडलं असेल. उद्धव ठाकरेंच्या फोनवरुन फोन केला जात नाही हे मला माहिती आहे, असं ते म्हणाले. जर शिंदेंना बाजूला करुन युती करायची असेल, तर मग युतीला नकार का देत होतात? अशी विचारणाही केसरकरांनी केली आहे.

आदित्य ठाकरेंवर बोलताना केसरकर म्हणाले, आम्ही तुमच्या आदरापोटी शांत आहोत. बाळासाहेबांचे नातू आहात म्हणून तुमच्या रक्तात शिवसेना आहे. पण आमच्या रक्तात बाळासाहेबांनी शिवसेना भिनवली आहे. त्यामुळे तो अभिमान बाळगत असताना सामान्य शिवसैनिकाचा अपमान करु नका. आम्ही तुमच्याबद्दल आदराने बोलत असताना तुम्हीही आदराने बोला. कोर्टात जो निर्णय होईल तो आम्ही मान्य करणार आहोत, असंही ते म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये