ताज्या बातम्यामनोरंजन

जय श्री राम! राम नवमीनिमित्त ‘आदिपुरूष’ चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित, मराठमोळ्या अभिनेत्याच्या लूकनं वेधलं लक्ष

मुंबई | Adipurush – आज (30 मार्च) संपूर्ण देशभरात राम नवमी (Ram Navami) मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. राम नवमीनिमित्त दिग्दर्शक ओम राऊतनं (Om Raut) ‘आदिपुरूष’ (Adipurush) या चित्रपटाचं पोस्टर शेअर केलं आहे. सोशल मीडियावर या पोस्टरची सध्या चर्चा सुरू असून या पोस्टरनं नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

आदिपुरूष चित्रपटाच्या पोस्टरमध्ये अभिनेता प्रभास (Prabhas) हा श्री रामाच्या भूमिकेत दिसत आहे. तर बाॅलिवूड अभिनेत्री क्रिती सेनन (Kriti Sanon) ही सीतेच्या भूमिकेत दिसत आहे. तसंच मराठमोळा अभिनेता देवदत्त नागे (Devdatta Nage) हा हनुमानाच्या भूमिकेत दिसत असून अभिनेता सनी सिंह (Sunny Singh) हा लक्ष्मणाची भूमिका साकारणार आहे. विशेष म्हणजे चित्रपटाच्या पोस्टरमधील मराठी अभिनेता देवदत्त नागेच्या लूकनं चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

दिग्दर्शक ओम राऊतनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आदिपुरूषचं पोस्टर शेअर केलं आहे. ‘मंत्रों से बढके तेरा नाम, जय श्री राम’ असं कॅप्शन त्यानं त्याच्या पोस्टला दिलं आहे. हा चित्रपट 16 जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचं पोस्टर प्रभास, क्रिती, देवदत्त आणि सनी सिंह यांनीही सोशल मीडियावर शेअर केलं आहे. तसंच आता आदिपुरूषचं पोस्टर पाहून प्रेक्षकांना या चित्रपटाची चांगलीच उत्सुकता लागली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये