ताज्या बातम्यादेश - विदेश

झारखंडमध्ये पहिल्या टप्प्यात ४३ जागांवर ६४.८६ टक्के पेक्षा जास्त मतदान

झारखंड विधानसभेच्या पहिल्या टप्प्यासाठी आज मतदान झाले. येथे विधानसभेच्या एकूण ८१ जागा आहेत. पहिल्या टप्प्यात राज्यातील ४३ जागांसाठी सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात झाली. निवडणूक आयोगाच्या नियोजनानुसार सायंकाळी ५ वाजता अधिकृतपणे मतदान संपले. मात्र, अनेक बूथवर सायंकाळी पाचनंतरही मतदारांच्या रांगा लागल्या होत्या, मतदान पूर्ण होईपर्यंत मतदान सुरू राहिले.

आयोगाच्या नियमांनुसार, ज्या बूथवर सायंकाळी ५ वाजण्यापूर्वी मतदारांनी रांगा लावल्या होत्या, तेथेच मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येतो. दरम्यान, मतदानाची आकडेवारी जाहीर करण्यात आली असून सायंकाळी ५ वाजेपर्यंत पहिल्या टप्प्यात ६४.८६ टक्के मतदान झाले आहे. दरम्यान, आता दुसऱ्या टप्प्यातील मतदान २० नोव्हेंबरला होणार असून २३ नोव्हेंबरला दोन्ही टप्प्यातील मतदानाचे निकाल जाहीर होणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये