पुणेराष्ट्रसंचार कनेक्टसिटी अपडेट्स

पुणे शहर काँग्रेस ज्येष्ठ नागरिक संघाचे पितृतुल्य दादा

ज्या भूमीमध्ये दादांनी २५-३० वर्षे काम केले. त्या काँग्रेस भवनला घर म्हणूनच वाहून घेतले होते आणि त्याच भूमीवर त्यांनी ’वृक्षारोपण’ करून आपला देह ठेवला. त्यांना ॲटॅक आला आणि होत्याचे नव्हते झाले. १९ जून रोजी पितृिदन करताना दादांची प्रकर्षाने आठवण होत होती. असा माणूस परत होणे नाही. त्यांच्या आत्म्यास सद्‌गती लाभो…

पुणे : उत्तमराव भूमकर (दादा) कडक, पण मायाळू स्वभावाचे. डोक्यावर सतत पांढरी गांधी टोपी. तीही कडक इस्त्रीची… गेली अनेक वर्षे काँग्रेस भवनमध्ये गेल्यावर प्रथम खिडकीतून दादांचा चेहरा दिसणार. दादांशी बोलताना ते शांत स्वभावाचे, पण तितकेच कडक असे दिसून आले. आपण कोणत्याही विषयावर बोलताना त्यामध्ये आपल्या काय अडचणी आहे हे जाणून त्यावर ते नेहमी सल्लामसलत करीत असत. दादांना एखादी गोष्ट पसंत पडली नाही तर लगेच चिडूनही बोलणार, पण शांत झाल्यावर तेवढ्याच मायेने ती गोष्ट आपल्याला पटवून देणारा त्यांचा स्वभाव मनाला पटायचा. आपण किती चिंतेत आहे हे जाणून ते प्रश्न घरचे असोत की दारचे ते लगेच सांगणार. अमक्याला भेटा, तमक्याला फोन करा, हे सांगून परत भेटल्यावर आवर्जून विचारणार ते काम झाले का नाही, याची विचारपूस करणार. असे दादा आज आमच्यात नाही याचे दुःख वेळोवेळी होत आहे.

दादा आणि मी गेली अनेक वर्षे ’पोलिस दक्षता समिती’वर काम करीत आलो. आम्ही एकमेकांना सहकार्य करून अनेक कौटुंबिक समस्या सोडविल्या. प्रत्येकाची कोर्टात जायची, वकिलांना पैसे देण्याची ऐपत नसायची. अशा लोकांच्या समस्या मोफत घरच्या घरी आम्ही सोडविल्या आहेत आणि त्यात आम्हाला पुरेपूर यश मिळाले. डेक्कन पोलिस स्टेशनचे पीएसआय यांचे आमचे वेळोवेळी अभिनंदन करून सत्कार केला. यामध्ये श्री. चांदगुडे, देशमुख, शास्त्री, पाटीलसर यांनी वेळोवेळी सहकार्य करून कौतुक केले, यांचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. राजकारणात आम्हाला काय मिळाले यापेक्षा किती लोकांना न्याय दिला, किती घर संसार उद्ध्वस्त होण्यापासून वाचवले, हे महत्त्वाचे…

कृष्णकांत कुदळे जाधव यांच्यानंतर ’ज्येष्ठ नागरिक मंच’ काँग्रेस भवनचा अध्यक्षपदाचा भार दादांनी आपल्या खांद्यावर घेतला आणि ज्येष्ठ नागरिक संघाचे २५०० ते ३००० सभासदांची नोंदणी झाली. ज्येष्ठांसाठी अनेक कार्यक्रम दादांनी राबविले होते. त्यामध्ये नेत्रतपासणी, नेत्रबिंदू ऑपरेशन, ज्येष्ठांना मोफत वकिलांचा सल्ला केंद्र, सहलीचे आयोजन, विविध प्रकारच्या स्पर्धा त्यामुळे ज्येष्ठांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले होते. दादांनी नगरसेवक, कार्यकर्ते यामध्ये प्रेमाचे नाते निर्माण केले होते.

निवडणुकीच्या धावपळीत त्यांच्या जोडीला रामचंद्र भुवडभाई पण असायचे. याचा करणे फोडणे हे काम दोघांशिवाय कोणाला जमायचे नाही. ते दोघेही हमतत्परतेने करीत असत. ज्या भूमीमध्ये दादांनी २५-३० वर्षे काम केले त्या काँग्रेस भवनला घर म्हणूनच वाहून घेतले होते आणि त्याच भूमीवर त्यांनी ’वृक्षारोपण’ करून आपला देह ठेवला. त्यांना अ‍ॅटॅक आला आणि होत्याचे नव्हते झाले. १९ जून रोजी पितृदिन करताना दादांची प्रकर्षाने आठवण होत होती, असा माणूस परत होणे नाही.
अनेक कार्यकर्ते, नगरसेवक, आमदार हे हळहळत होते, दुःख करीत होते. “मरावे परी कीर्ती रूपे उरावे’ दादांना कोटी कोटी भावसुमने अर्पण. सर्व ज्येष्ठ नागरिक मंचाचे वतीने भावपूर्ण श्रद्धांजली…

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये