अर्थताज्या बातम्यादेश - विदेश

सर्वसामान्यांच्या खिशाला ओझं! महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल महाग, आजपासून असणार ‘हा’ दर

नवी दिल्ली : (Petrol-Diesel Price increaseon 2 May 2023) आजचा (2 मे 2023) दिवस सर्वसामान्य नागरिकांना झटका देणारा दिवस ठरले असं वाटतंय. कारण सरकारी तेल कंपन्यांनी सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलचे (Petrol-Diesel Price) नवे दर जाहीर केले आहेत.

मात्र, दिलासा देणारी बाब म्हणजे इंधन दरात कोणताही बदल झालेला नाही. 21 मध्ये केंद्रातील मोदी सरकारने वाहन इंधनावरील (पेट्रोल-डिझेल) उत्पादन शुल्क कमी केले असले तरी महाराष्ट्रातील काही भागात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत किंचीत बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे.

देशातील तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे (Petrol-Diesel Price) नवीनतम दर जाहीर केले आहेत. यामध्ये बिहारमध्ये पेट्रोल 25 पैशांनी स्वस्त होऊन 108.90 रुपये आणि डिझेल 23 पैशांनी स्वस्त होऊन 95.57 रुपये प्रति लिटर झाले आहे. तर छत्तीसगडमध्येच पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 47 पैशांनी घट झाली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये पेट्रोल 1 रुपये आणि डिझेल 78 पैशांनी स्वस्त झाले आहे.

मात्र महाराष्ट्रात पेट्रोल 41 पैशांनी वाढून 106.85 रुपये तर डिझेल 93.35 रुपयांवर पोहोचले आहे. पंजाब, उत्तर प्रदेश आणि गुजरातमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात किरकोळ वाढ झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये