देश - विदेश

“भावना व्यक्त करायला माझ्याकडे शब्द नाहीत…”; पंतप्रधानांनी दिली ओडिशातील रेल्वे अपघातस्थळी भेट

ओडिशा Odisha Train Accident : ३०० हून अधिक प्रवासी मृत्युमुखी आणि शकडो प्रवासी गंभीर जखमी झालेल्या ओडिशातील बालासोर ट्रेन दुर्घटनेने (Balasor Train Tragedy) संपूर्ण देश हादरला आहे. सगळ्यांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, सरकारकडून मृतांच्या कुटुंबियांना आणि जखमींना आर्थिक मदतीची घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अपघातस्थळाला भेट दिली आहे. जखमींची देखील रुग्णालयात जाऊन त्यांनी भेट घेतली आहे. त्यावेळी त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. (PM Narendra Modi On Odisha Train Accident)

“या वेदनांना व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीयेत. हा खूपच भीषण अपघात आहे. मी पूर्णतः विचलित झालो. या दुर्घटनेचा सर्व दृष्टीकोनातून तपास केला जाईल. यात दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. अपघातात नुकसान झालेल्यांच्या आम्ही कायम सोबत आहोत.” अशा भावना नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केल्या.

मोदी यांनी स्थानिकांचे देखील आभार मानले. परिसरातील लोकांनी रात्रभर जागरण करून अपघातात सापडलेल्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले. अनेकांनी जखमींना ऐन वेळी रक्तदान केले. त्या सर्वांचे मोदींनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये