ताज्या बातम्यामनोरंजन

‘द केरला स्टोरी’ या चित्रपटावर भाष्य करत पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल

The Kerala Story : कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत बजरंग दलावर बंदी घालण्याच्या मागणीवरून भाजपा आणि काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहे. त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकातल्या प्रचारसभेत बहुचर्चित ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटावर भाष्य करत काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून काँग्रेसकडूनही सातत्याने प्रतिक्रिया येत आहेत. बेल्लारी येथील प्रचारसभेत बोलताना नरेंद्र मोदी यांनी द केरला स्टोरी या चित्रपटाचा उल्लेख करत ही टिपण्णी केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, दहशतवादी कट असलेल्या एका कथानकावर आधारित चित्रपट ‘केरला स्टोरी’ सध्या खूप चर्चेत आहे. हा चित्रपट केवळ एका राज्यातल्या दहशतवादी कटांवर आधारित आहे. केरळ हे देशातलं खूप सुंदर राज्य आहे. केरळमधले लोक खूप परिश्रमी आणि प्रतिभावान असतत. परंतु त्याच केरळमध्ये सुरू असलेल्या दहशतवादी कटाचा खुलासा या चित्रपटाने केला आहे.

पंतप्रधान म्हणाले, बॉम्ब-बंदूक आणि पिस्तूलाचा आवाज ऐकू येतो. परंतु समाजाला आतून पोखरण्याचा आवाज येत नाही. कोर्टानेही आतंकवादाच्या या स्वरुपाबाबत चिंता व्यक्त केल्या आहेत. परंतु आपल्या देशाचं दुर्भाग्य बघा. आपल्या समाजाला उद्ध्वस्त करणाऱ्या या दहशतवादी प्रवृत्तीच्या पाठीशी काँग्रेस उभी आहे. पुढे ते म्हणतात, काँग्रेस दहशतवादी प्रवृत्ती असलेल्या लोकांशी मागल्या दाराने राजकीय सौदेबाजी देखील करत आहे. म्हणूनच कर्नाटकमधील लोकांनी या काँग्रेसपासून सावध राहिलं पाहिजे. हे लोक चित्रपटावर बंदी आणण्याचा प्रयत्न करत आहेत. मी काँग्रेसला असं काही करताना पाहतो तेव्हा मला खूप आश्चर्य वाटतं.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये