ताज्या बातम्यापिंपरी चिंचवड

मेट्रो फिडर सेवेमुळे ‘पीएमपीएल’ लखपती; अवघ्या महिन्यात तब्बल ‘एवढे’ उत्पन्न

मेट्रोच्या प्रवाशांच्या सुविधेसाठी मेट्रोथांब्यांना जोडणारी पीएमपीकडून मेट्रो फिडर सेवा सुरू करण्यात आली होती. त्या अनुषंगाने १२ मार्गांवर फिडर सेवा देण्यात आली. वारंवारिता व वेळेचे ताळमेळ नसल्याने ही सेवा गुंडाळावी लागते की काय, अशी शक्यता होती. मात्र, त्यानंतर पीएमपीच्या वतीने योग्य नियोजन करून तसेच, प्रवाशांच्या सर्वेक्षणानंतर त्या ठिकाणी बससेवा सुरू केल्यानंतर या सेवेला प्रतिसाद मिळू लागला आहे. आता फिडर सेवेत वाढ करून पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात एकूण १६ मार्गांवर ‘फिडर’ सेवा सुरू आहे. मागील महिनाभरात पीएमपीएलला ४२ लाख ६५ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. यामुळे आणखी काही मार्गांवर ही सेवा सुरू करण्याची चाचपणी सुरू आहे.

पिंपरी ते सिव्हिल कोर्ट आणि वनाज ते रामवाडीपर्यंत मेट्रोसेवा सुरू झाली आहे. त्यामुळे नागरिकांचा प्रवास सुखकर झाला आहे. मेट्रो स्टेशन ते घरापर्यंत प्रवास करता यावा म्हणून पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपीएल) शहरात १२ ठिकाणी फिडर सेवा सुरू केली आहे. पण, त्याचे योग्य नियोजन नसल्याची ओरड करण्यात आली होती. त्यातून बसची वाट पाहात प्रवासी निघून जात होते. या कारणामुळे ही सेवा तोट्यात जाऊ लागली. दरम्यान यानंतर पीएमपी अधिकाऱ्याने या सर्व मार्गांचे सर्वेक्षण केले. त्याचप्रमाणे प्रवाशांच्या गरजा ओळखून त्या ठिकाणी सेवेमध्येदेखील बदल केला. यामधून महिनाभरातच पीएमपीएल मालामाल झाली आहे.

सेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. काही महिन्यांपूर्वी सेवेबाबत सर्वेक्षण केले होते. स्वारगेट स्थानकापासून ५ मार्गांवर फिडर बससेवा सुरू करण्यात आली आहे. मेट्रो फिडरची प्रवासी संख्या अधिक वाढवण्याचे प्रयत्न करणार आहे, अशी माहिती पीएमपीएमएलचे मुख्य वाहतूक व्यवस्थापक सतीश गव्हाणे यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये