Top 5इतरताज्या बातम्यादेश - विदेशमनोरंजन

जोडप्याचं खाकी वर्दीत प्री-वेडिंग शूट ! पोलीस अधिकारी संतापले म्हणाले ,हे लाजिरवाणं …

हैद्राबाद :

हैदराबादमधील एका जोडप्याचं प्री-वेडिंग शूट सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. दोघे ही पोलीस अधिकारी आहेत आणि त्यांच्या प्री वेडिंग शूट मध्ये त्यांनी पोलिसांच्या खाकी वर्दीमध्ये देखील शूट केलं आहे.

सध्याच्या जमान्यात लग्न म्हटलं तर प्री-वेडिंग शूट करणं ही एक फॅशनच झाली आहे. कोणत्याच कुटुंबातील जोडप्यांनाही प्री-वेडिंग शूट करण्याचा मोह आवरत नाही. काही प्री-वेडिंग शूट आपल्या हटक्या स्टाईलमुळे व्हायरलही होतात. असंच एक शूट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. पण हे प्री-वेडिंग शूट व्हायरल होण्यामागचं कारण म्हणजे हे जोडपं पोलीस अधिकारी आहे. या व्हिडीओत त्यांनी दोन मिनिटांचं गाणं वापरलं आहे. इतकंच नाही तर व्हिडीओच्या सुरुवातीला खाकी वर्दीत आणि सरकारी वाहनात दिसत आहे.

प्री-वेडिंग शूटमध्ये या जोडप्याने व्हिडीओत पोलिसांची खाकी वर्दी आणि सरकारी संपत्तीचा वापर केल्याने आक्षेप नोंदवला आहे. यादरम्यान एका वरिष्ठ अधिकाऱ्याने या व्हिडीवओवर भाष्य केलं असून, त्यांनी दिलेला सल्ला व्हायरल झाला आहे. आयपीएस आनंद यांनी जोडप्याच्या उत्साहाचं आणि त्यांच्या खाकीवरील प्रेमाचं कौतुक केलं आहे. पण हे थोडंसं लाजिरवाणं असल्याची देखील सांगितलं आहे. तसंच या जोडप्याला भेटून आशीर्वाद देण्यासाठी आपण उत्सुक असल्याचं सांगितलं आहे.

आयपीएस आनंद यांनी आपल्या ट्विटरवर पोस्ट करत दोघंही मला त्यांच्या लग्नासाठी थोडे अतिउत्साही दिसत आहे आणि हे चांगलं पण थोडं लाजिरवाणं आहे. पोलीस होणं आणि त्यातही खासकरुन महिलांसाठी हे फार कठीण कार्य आहे. “ते दोघंही पोलीस अधिकारी आहेत. त्यामुळे त्यांनी पोलीस खात्याची संपत्ती, चिन्हं वापरणं यात मला फार काही चुकीचं वाटत नाही. जर त्यांनी मला आधीच सांगितलं असतं तर आम्ही नक्कीच त्यांनी परवानगी दिली असती. आपल्यापैकी काहींना राग येत असेल, पण मला त्यांच्या लग्नाला आमंत्रण दिले नसले तरी त्यांना भेटून आशीर्वाद द्यावासा वाटतो. अर्थात, योग्य परवानगीशिवाय याची पुनरावृत्ती करू नका असा सल्ला मी इतरांना देतो”.

काहींनी या जोडप्याने आपल्या खाकी वर्दीचा चुकीचा वापर केल्याची टीका केली आहे. तर काहींनी या जोडप्याकडून टॉलिवूडने काहीतरी शिकावं असा सल्ला दिला आहे

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये