BKC वर शिंंदेंच्या मेळाव्याला पुण्यातून परप्रांतीय कामगार; म्हणाले, “आम्ही राज ठाकरेंच्या…”

मुंबई : (Shivsena And Shinde group dasra melava) काल शिवसेना आणि शिंदे गटाचा मुंबईत मोठ्या दणक्यात दसरा मेळावा पार पाडला. मात्र, शिवसेनेच्या शिवाजी पार्कच्या मेळाव्याला राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक स्वखर्चानं आणि चटणी भाकर घेऊन आले आठरा वर्षापासूनचे तरुण ते 80 वर्षाचा जेष्ठ शिवसैनिक या मेळाव्यात दिसला. निष्ठा काय असते हे या शिवसैनिकांकडे पाहिल्यावर कळते.
तर दुसऱ्या बाजूला शिंदे गटाला मात्र, बीकेसी मैदानावर गर्दी जमवण्यासाठी नाकी नऊ आल्याचे दिसून आले. त्यासाठी त्यांना परराज्यातील कामगार, आदिवाशी बांधव आणि जे मिळेल त्यांना खोटे सांगून, ज्यांचा शिवसेनेशी काहीही संबंध नाही अशा लोकांना बसमध्ये बसवून घेऊन येण्याची वेळ ओढावली. अनेक माध्यमांनी शिंदे गटाच्या गर्दी जमवण्याचे भिंग फोडले. हे संपुर्ण राज्यातील जनतेने उघड्या पाहिले सत्तेचा कसा दुरुपयोग केला जात आहे. पुण्यातून शिंदे गटाने उत्तरप्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल येथिल कामाकारांना काही पण खोटे सांगून फक्त गर्दी भरवण्याचे काम करण्यात आलं.
दरम्यान, माध्यमांनी या परप्रांतीय कामगारांना विचारलेल्या प्रश्नावर काहीच उत्तर देता आले नाही. कुठे जाताय, कोण घेऊन जात आहे, का जाताय, काय आहे मुंबईला, कोणाचा मेळावा आहे यापैकी कोणत्याही प्रश्नाचे उत्तर त्यांच्याकडे नव्हते. तर काही लोकांनी अक्षर्शा त्यामुळे शिंदे गटावर गर्दी जमवण्यासाठी भेटल त्याला आणि येईल तो अशा प्रकारे लोक घेऊन येण्याचे काम नेत्याने केले आहे. त्यामुळे शिंदे गटावर तोंडावर पडण्याची वेळी आली आहे.