दाक्षिणात्य अभिनेते प्रकाश राज यांनी हिटलरशी केली PM मोदींची तुलना; सोशल मीडियावर त्यांच्या ट्वीटची चर्चा

मुंबई | दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेते प्रकाश राज (Prakash Raj) हे सतत त्यांच्या सोशल मीडिया पोस्ट आणि वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. ते सामाजिक विषयांवर बिनधास्तपणे त्यांचे मत मांडताना दिसतात. प्रकाश राज हे बराच वेळा भाजपवर निशाणा साधताना दिसतात. नुकताच त्यांनी केलेल्या ट्वीटने सर्वांचे लक्ष वेधले आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची तुलान हिटलरशी केल्याचे म्हटले जात आहे. या फोटोला त्यांनी दिलेल्या कॅप्शननं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
प्रकाश राज यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये काय लिहिले आहे?
प्रकाश राज यांनी हिटलर आणि नरेंद्र मोदी यांचा लोकांसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोला त्यांनी कॅप्शन दिलं, ‘इतिहासाची पुनरावृत्ती.. काटेरी तारांमागे भविष्य आहे.. सावधान..’ प्रकाश राज यांच्या या ट्वीटची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे. प्रकाश राज यांनी हा फोटो सोशल मीडियावर शेअर करुन नरेंद्र मोदी यांची तुलना हिटलरसोबत केली का? असा प्रश्न सध्या अनेकांना पडला आहे.