…अन् विराट कोहलीने धावत जात, दमलेल्या खेळाडूंची भागवली तहान; Video व्हायरल

Virat Kohli Water Boy Video : भारताचा कर्णधार रोहित शर्माने आशिया कपमधील बांगलादेशविरूद्धच्या सामन्यात संघात तब्बल 5 बदल केले. भारतीय संघ आधीच आशिया कपच्या फायनलमध्ये पोहचला असल्याने आजच्या सामन्यात अनेक दिग्गज खेळाडूंना विश्रांती देण्यात आली. यात विराट कोहलीचा देखील समावेश आहे.
दरम्यान, विराट कोहलीने विश्रांती काळात देखील स्वस्थ न बसता संघासाठी आपले योगदान दिले. तो वॉटर बॉय झाला अन् त्याने मैदानावर दमलेल्या खेळाडूंची तहान भागवली. विराट कोहली हा ज्या ज्यावेळी मैदानावर असतो त्या त्यावेळी तो आपल्या उत्साहीपणाने सर्वांचे लक्ष वेधून घेत असतो.
जागतिक स्तरावरील एवढा मोठा खेळाडू असूनही आपल्या संघ सहकाऱ्यांना पाणी देतानाही विराट कोहलीने जो उत्साह दाखवला त्याची चर्चा सोशल मीडियावर होत आहे.
दरम्यान, रोहित शर्माने बांगालेदशविरूद्धच्या सामन्यासाठी आपल्या संघात 5 बदल केले आहेत. त्याने विराट कोहली, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, हार्दिक पांड्या, कुलदीप यादव यांना विश्रांती दिली. त्यांच्या ऐवजी संघात तिलक वर्मा, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद शमी, शार्दुल ठाकूर आणि अक्षर पटेल यांचा समावेश करण्यात आला आहे.