पिंपरी चिंचवड

शहरातील ८५ टक्के कचर्‍याचे योग्य पद्धतीने वर्गीकरण ः आयुक्त

पिंपरी : देशातील नागरिकांना स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी आणि निरोगी, सुंदर शहरासाठी स्वच्छ सर्वेक्षण २०२२ अभियान देशपातळीवर राबविले जात आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने अभियानात सहभाग नोंदविला आहे.

शहर स्वच्छतेसाठी महापालिका प्रशासनाकडून विविध योजना आखण्यात आल्या आहेत. अभियानाला शहरातील नागरिक, शाळा, महाविद्यालये, सामाजिक, पर्यावरण संघटनांकडूनदेखील सकारात्मक प्रतिसाद मिळत असून ८५ टक्के ओला व सुका कचर्‍याचे योग्य पद्धतीने वर्गीकरण करण्यात महापालिका यंत्रणा यशस्वी ठरली आहे. कदाचित, इतक्या मोठ्या प्रमाणात कचरा संकलित करून त्याचे वर्गीकरण करणारी पिंपरी चिंचवड महापालिका एकमेव असेल, असा विश्वास आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी व्यक्त केला आहे.

  • स्वच्छतेकडून समृद्धीकडे ही संकल्पना : सर्व क्षेत्रीय कार्यालयांद्वारे जनजागृती केली जात आहे. क्षेत्रीय अधिकारी, सहायक आरोग्याधिकारी, मुख्य आरोग्य निरीक्षक, आरोग्य निरीक्षक, मुकादम यांच्यासह स्वच्छता कर्मचारी, घंटागाडी कर्मचारी यांच्या माध्यमातून रात्रंदिवस शहर परिसर स्वच्छ केले जात आहेत. पुढील दहा दिवस चोखपणे कामगिरी बजावून https://bit.ly/PSSSwachhSurvekshanFeedback या लिंकद्वारे नागरिकांचा सकारात्मक फीडबॅक नोंदविण्यासाठी प्रोत्साहित करायचे आहे. शहराला देशपातळीवर नावलौकिक मिळवून देण्यासाठी नागरिकांनी स्वच्छ सर्वेक्षण अभियानात सहभाग नोंदविण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

ऑटो क्लस्टर, चिंचवड येथे बुधवारी (दि. ६) आयोजित कार्यशाळेवेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. सध्या आपले शहर स्वच्छ सर्वेक्षण २०२२ मध्ये सिटीझन फीडबॅक कॅटॅगिरीत पहिल्या ५ शहरांमध्ये आहे. आपल्याला शहर पहिल्या क्रमांकावर घेऊन जायचे आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये