14 वर्षाच्या मुलीला 50000ला विकून लग्न लावणारे पुणे पोलिसांच्या ताब्यात; मध्यप्रदेशातून मुलीची सुटका

पुणे | भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन पुणे शहर हद्दीत राहणारी एक 14 वर्षांची अल्पवयीन मुलगी बेपत्ता असल्याची खबर मुलीच्या नातेवाईकांनी पोलीस स्टेशन येथे दिली सदर मुलगी अल्पवयीन असल्याने अज्ञात आरोपीविरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन पुणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्यानंतर सदरील गुन्हयाचा तपास अतुल थोरात पोलीस उपनिरीक्षक भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन पुणे हे करत आहेत.
सदर गुन्हयाचा तपास करत असताना तपासादरम्यान बेपत्ता असलेली अल्पवयीन मुलगी वय 14 वर्षे ही मध्यप्रदेश याठिकाणी असल्याची माहिती मिळून आली. या बातमीची यात्री केल्यानंतर मा. अप्पर पोलीस आयुक्त सो, पोलीस उपायुक्त सो यांचे मार्गदर्शनाखाली अतुल पोरात पोलीस उपनिरीक्षक, पोलीस हवालदार 5789 रवींद्र चिप्पा, पोलीस शिपाई 9133 सागर काँडे, महिला पोलीस शिपाई 9471 पुजा लोंढे असे मध्यप्रदेश येथे तात्काळ रवाना झाले.
त्याठिकाणी बेपत्ता असलेली अल्पवयीन मुलगी ग्यास ग्राम, ना सेवढा जि. दतिया, राज्य मध्यप्रदेश याठिकाणी असल्याची आणि तिचे लग्न झाल्याने माहिती स्थानिक पोलीसांच्या मदतीने काढली त्यानंतर तेथील तपास पथकाच्या मदतीने ग्राम म्यारा ता. सेवढा जि दतिया मध्य प्रदेश याठिकाणी सदर मुलगी राहत असलेल्या घरामध्ये छापा टाकून मुलीस सुखरूप ताब्यात घेतली. सदर मुलीचे लग्न जबरदस्तीने धर्मेंद्र किलेदारसिंग यादव (वय 22 वर्ष, मध्य प्रदेश) या अनोळखी इसमाशी लावून दिल्याचे निष्पन्न झाले.