क्रीडादेश - विदेश

भारताला हरवा अन् माझ्याशी लग्न करा; पाकिस्तानी अभिनेत्रीची खुली ऑफर

नवी दिल्ली | Pak Actor Sehar Shinwari – रंगात आलेली वर्ल्ड टी-20 चॅम्पियनशिप शेवटच्या टप्प्यात येऊन पोहचली आहे. तर विश्वचषक स्पर्धेतून पाकिस्तान संघ बाहेर पडलेला आहे. दुसऱ्या बाजूला पाकिस्तानी अभिनेत्री सेहर शिनवारीने (Sehar Shinwari) खुली ऑफर देत एक ट्विट केलं आहे. तिने भारत-झिम्बाब्वे टी-20 सामन्याआधी ट्विट केलं आहे. या ट्विटची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. शिनवारीने तिच्या ट्विटर हँडलवरून ट्विट केलं आहे की, “जर झिम्बाब्वेने चमत्कारिकरित्या भारताला हरवले तर ती झिम्बाब्वेच्या पुरुषाशी लग्न करेल”.असं तिनं या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

तसंच नुकत्याच झालेल्या बांगलादेश विरुद्ध भारत या सामन्यादरम्यान देखील सेहरने ट्विट करत भारत सामना हरेल अशा शब्दात शुभेच्छा दिल्या होत्या. त्यानंतर आता तिने हे नवीन ट्विट केल्यामुळे ती चांगलीच चर्चेचा विषय बनली आहे. यामुळे तिच्या या ट्विटला क्रिकेटप्रेमी कमेंट करत उत्तर देत आहेत.

https://twitter.com/SeharShinwari/status/1588036680451227648

दरम्यान, या अभिनेत्रीला एका युजरने ट्विट करत म्हंटलं आहे की, मला तुझ्यासाठी खूप वाईट वाटत आहे कारण तू आयुष्यभर एकटी राहणार आहेस. तर दुसऱ्यानं लिहिलं, भारतानं बांगलादेशला हरवल्यावर तुम्ही तुमचे ट्विटर अकाउंट डिलीट करायला हवे होते. अशा शब्दात प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. तर येत्या 6 नोंहेबरला झिम्बाब्वे विरोध भारत असा सामना रंगणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये