ताज्या बातम्यादेश - विदेशमहाराष्ट्ररणधुमाळी

“शिंदे बेकायदेशीर सरकार बनवण्यात यशस्वी, पण…” ममता बॅनर्जी

मुंबई : महाराष्ट्रातील सत्तांतर झाल्यानंतर राज्यातील राजकारणावर देशातील दिग्गज आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. महाविकास आघाडीसोबत असलेले उद्धव ठाकरे हे एकनाथ शिंदे गटाच्या भाजपसोबत जाण्याने एकटे पडले आहेत. त्यांच्याबद्दल देशभरातील भाजप विरुद्ध असलेल्या पक्षांच्या नेत्यांना कळवला निर्माण झाला आल्याचं दिसत आहे.

राष्ट्रपती पदासाठी निवडणुका जवळ आलेल्या असताना देशभरात राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे. राष्ट्रपती निवडणुकीसाठी सगळ्या राज्यातील भाजप विरोधी पक्षांनी एकत्र येऊन केंद्रातील विरोधी पक्ष कॉंग्रेसला पाठींबा द्यावा अशा प्रकारचं आवाहन पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या सतत करत आहेत. त्यासाठी त्यांनी देशातील दिग्गज नेत्यांबरोबरच महाराष्ट्रातील शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना देखील पत्र लिहिलं होतं.

दरम्यान, आज (गुरुवार) ममता बॅनर्जी माध्यमांशी बोलत होत्या. त्यांना महाराष्ट्रातील शिंदे सरकारबाबत विचारलं असता त्यांनी शिंदे सरकार बेकायदेशीर असल्याचा गंभीर आरोप केला. त्या म्हणाल्या, “एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटातील बंडखोर आमदारांना बंड करण्यासाठी फक्त पैसाच नाही तर आणखीही काहीतरी देण्यात आलं आहे. गुवाहाटीत एवढ्या मोठ्या हॉटेल मध्ये ते अनेकदिवस मौजमजा करत होते त्यासाठी त्यांना पैसा तर मिळालाच त्याचबरोबर अजूनही काही गोष्टी त्यांना मिळाल्या असणार असं त्या एक वृत्तवाहीनिशी बोलताना म्हणत होत्या.

महाराष्ट्रातील शिंदे सरकार बेकायदेशीर आहे. त्यांनी सत्ता तर मिळवली मात्र महाराष्ट्राच्या जनतेचे मन नाही जिंकत आले. भाजप काय करू शकते आणि काय नाही हे मला चांगलं माहिती आहे. मला काय म्हणायचंय हे सगळ्यांना माहिती आहे असं म्हणत त्यांनी भाजपवर निशाना साधला.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये