ताज्या बातम्यादेश - विदेशरणधुमाळी

महागाई, बरोजगारीविरोधात काँग्रेसचं आंदोलन, राहुल गांधींसह प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात

नवी दिल्ली | Rahul Gandhi Detained – महागाई आणि बेरोजगारीविरोधात काँग्रेस आक्रमक झाली असून देशभरात आंदोलन करत आहे. त्यामुळे काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात देशव्यापी आंदोलनाला सुरवात झाली आहे. दिल्ली, मुंबई, नागपूरसह देशभरात काँग्रेस कार्यकर्त्यांकडून केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करत निषेध करण्यात येत आहे. यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेसचा संसद भवन ते राष्ट्रपती भवन असा मोर्चा निघणार होता. पण दिल्ली पोलिसांनी काँग्रेसचा हा मोर्चा रोखला आणि आंदोलक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. यावेळी दिल्ली पोलिसांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना ताब्यात घेतलं. यानंतर काँग्रेस कार्यकर्ते अधिकच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं.

आज (6 ऑगस्ट) काँग्रेसकडून केंद्र सरकारविरोधात देशव्यापी आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीसह मुंबई आणि नागपुरातही काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. मुंबई आणि नागपूरमध्येही पोलिसांनी काँग्रेस कार्यकर्त्यांची धरपकड सुरु केली. मुंबईतही पोलिसांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. तसंच मुंबईत पोलिसांनी नाना पटोले यांना ताब्यात घेतलं. याशिवाय पुण्यातही काँग्रेस नेत्यांची धरपकड करण्यात आली आहे.

दिल्लीमध्ये राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी काळे कपडे परिधान करत महागाई आणि बेरोजगारीवरून केंद्र सरकारचा निषेध केला. या आंदोलनात काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनीही सहभाग घेतला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये