ताज्या बातम्यादेश - विदेशरणधुमाळी

महाराष्ट्रातून बाहेर पडताच राहुल गांधीचं भावूक; पत्र लिहित म्हणाले; “शिवाजी महाराजांचं शौर्य…”,

मुंबई : (Rahul Gandhi’s emotion; writing a letter) देशाच्या राजकारणात पडझड झालेल्या काँग्रेस पक्षाला नवसंजिवणी देण्यासाठी खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वाखाली कन्याकुमारी ते जम्मू-काश्मीर ‘भारत जोडे यात्रा’ काढण्यात येत आहे. या यात्रेत महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाल्याचं दिसून आलं. जय शिवाजी, जय महाराष्ट्र म्हणत राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातून दोन दिवासांपूर्वी निरोप घेतला. त्यानंतर त्यांनी भावनिक पत्र लिहिले आहे.

दरम्यान, राहुल गांधी यांच्या या पत्राची माध्यमांमध्ये आणि राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात चर्चा होताना दिसत आहे. यावेळी त्यांनी पत्रात म्हटलं आहे कि, महाराष्ट्रातील महापुरुष, विचारवंत, संतांचा वारसा घेऊन निघालो आहे. देशाला पुरोगामी विचार देणाऱ्या महाराष्ट्राचे धन्यवाद. अशा शब्दात आभार मानले. तसंच शेतकरी, बेरोजगार तरुणांच्या समस्यांमुळे व्यथीत झालो. अशी निराश भावना राहुल गांधी यांनी पत्रातून व्यक्त केली आहे.

भारत जोडो यात्रेत राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये जाऊन त्यांनी अनेकांशी गाठीभेटी घेतल्या. काँग्रेससह अनेक राजकीय पक्षांनी या भारत जोडो यात्रेला सहभाग नोंदवला. राहुल गांधी यांनी निमखेडी येथील शेवटच्या कॉर्नर सभेत महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानले. शिवाजी महाराजांचं शौर्य, बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान, महात्मा फुले यांची शिकवण, आणि सर्व महाराष्ट्रवासियांचं प्रेम प्रेरणा समजून पुढे जात आहे. या सत्कार आणि अभूतपूर्व अनुभवासाठी मी प्रदेशातील लोकांचे मनापासून आभार मानतो. जय शिवाजी, जय महाराष्ट्र! असं ट्विट राहुल गांधी यांनी केलं होतं.

https://twitter.com/RahulGandhi/status/1594326389981085696

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये