राहुल गांधी देशात द्वेष पसरवण्याचं काम करतात ; केंद्रीय मंत्र्याचा आरोप

नवी दिल्ली: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा ट्विटद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे .त्यांनी ‘द्वेषाचा बुलडोझर’अशा शब्दात केलेल्या ट्विटला केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी माध्यमांशी बोलताना उत्तर दिल आहे. ठाकूर म्हणाले की , राहुल गांधी देशात द्वेषाची निर्माण करत असून त्यांना देशाचं भलं झालेलं बगवत नाही.असा आरोपही त्यांनी त्यावेकी केला तसेच जे स्वतःच भ्रष्टाचारी आहेत त्यांच्याकडून तुम्ही अशाच विधानाची अपेक्षा करू शकता असं ठाकुरांनी म्हंटलं .
तर राहुल गांधी यांनी त्यांच्या ट्विटमधून थेट भाजपवर निशाणा साधत म्हणंले की , मोदीजी देशात महागाई वाढली मंदी सुरु आहे वीज खंडित झाल्यामुळे छोटे व्यवसाय उद्योग उद्धवस्त होत आहेत. अशा सर्व गोष्टीमुळे जास्त रोजगार निर्माण कसे होणार यासाठी प्रयत्न करावेत. भाजपकडून या आठ वर्षांत फक्त मोठ बोलणंच झाल त्यामुळे आता फक्त आठ दिवसाचा कोळसा शिल्लक राहिला आहे . या सगळ्यासाठी द्वेषाचा बुलडोझर थांबवा आणि वीज प्रकल्प सुरू करा, असं त्यांनी म्हंटलं होतं.यामुळे याला केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिल आहे.