”तडजोड करावी लागली तर, घरात बसेन पण…” राज ठाकरे थेटच बोलून गेले

मुंबई : (Raj Thackeray kokan Tours) मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्याचा दौरा सुरु केला आहे. एकीकडे शरद पवार, दुसरीकडे उद्धव ठाकरे आणि तिसरीकडे राज ठाकरेंनी कोकणापासून दौऱ्याला सुरुवात केली आहे. त्या पंधरा दिवसांमध्ये राज ठाकरे पक्षाचा मेळावा घेणार आहेत. त्यापूर्वी त्यांनी आज चिपळूणमध्ये पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला.
यावेळी राज बोलताना म्हणाले की, राज्यामध्ये जो व्यभिचार सुरु आहे तो मी कधीही करणार नाही. तडजोड करावी लागली तर घरात बसेन परंतु तडजोड करणार नाही. कार्यकर्त्यांनी मनाने एकत्र येऊन काम करणं आवश्यक असल्याचं राज यांनी सांगितलं.
राज ठाकरेंनी आजपासून कोकण दौऱ्याला सुरुवात केली असून चिपळूणमधील पदाधिकाऱ्यांच्या दौऱ्यानंतर ते पुढे खेड, दापोलीकडे रवाना झाले आहेत. त्यांच्यासोबत मनसेचे वरिष्ठ पदाधिकारी अविनाश जाधव, संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई यांची उपस्थिती आहे.