रामदास कदमांचा ठाकरेंवर पुन्हा हल्लाबोल; म्हणाले, “उद्धव ठाकरेंना उद्ध्वस्त करून…”,

मुंबई : (Ramdas Kadam On Uddhav Thackeray) शिंदे गटाचे नेते रामदास कदम हे सातत्याने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत आहेत. कदमांनी आज पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. अयोध्येला जाण्याचं प्रयोजन विचारल्यानंतर कदम म्हणाले की, “उद्धव ठाकरेंना उध्वस्त करून राज्यात शिवशाही आणण्यासाठी रामचंद्राचा आशीर्वाद घ्यायला आम्ही अयोध्येला जात आहोत.”
रामदास कदम म्हणाले की, दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी बेईमानी करण्याचं काम उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. उद्धव ठाकरेंना उध्वस्त करून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आत्म्याला शांती लाभावी, बाळासाहेबांना अभिप्रेत असलेली शिवशाही महाराष्ट्रात पुन्हा आणावी, तसेच बाळासाहेबांना अभिप्रेत असलेलं काम राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारकडून व्हावं म्हणून प्रभू श्रीरामचंद्रांचा आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही अयोध्येला जात आहोत.
रामदास कदम म्हणाले ती, चोर कोण आणि साव कोण याचा फैसला लवकरच होईल, लवकरच दूध का दूथ आणि पाणी का पाणी होईल. आमच्या आमदारक्या कोणी चोरल्या, नेत्यांची मंत्रिपदं कोणी चोरली ते मातोश्रीमध्येच बसलेत. सर्वकाही लवकरच कळेल, त्यांची (उद्धव ठाकरे आणि संजय राऊत) टीका म्हणजे सौ चूहे खा के बिल्ली हज को चली अशी आहे. त्यांची स्थिती म्हणजे खोटं बोल पण रेटून बोल अशी आहे. सर्व खऱ्या गोष्टी लोकांच्या, राज्यातल्या जनतेच्या समोर याव्यात म्हणून आम्ही अयोध्येला जात आहोत.