तिकीट कापण्याच्या चर्चेवर भाजपचे खासदार म्हणाले, “मी भाजपचा सच्चा कार्यकर्ता, जर उमेदवारी नाकारली तर…”

वर्धा : (Ramdas Tadas On Chandrashekhar Bawankule) आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) भाजपने (BJP) कंबर कसली असून त्याची जोरदार तयारी सुरू केल्याचं चित्र आहे. मिशन 45 साठी भाजपची मोर्चे बांधणी सुरू झाली आहे. लोकसभा निवडणुकीत मिशन 45 प्लससाठी भाजपनं मोठी खेळी केल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र भाजपमधील अनेक मोठ्या चेहऱ्यांना लोकसभेचं तिकीट दिलं जाणार आहे.
वर्धाचे खासदार रामदास तडस (Ramdas Tadas) यांना आगामी लोकसभा निवडणुकीत आपले तिकीट कापले जाणार असल्याची माहिती आहे असा प्रश्ना त्यांना विचारण्यात आला होता. त्यावेळी त्यांना विचारलेल्या प्रश्नाला तडस यांनी उत्तर दिले आहे. ते म्हणाले, “मी भाजपचा (BJP) सच्चा कार्यकर्ता असून भाजपशी कायम एकनिष्ठ राहणार आहे”, आम्ही कोणत्या पदासाठी काम करत नाही तर पक्षासाठी काम करतोय, तिकीट कापले तरी मी पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून काम करेल, असंही ते म्हणाले.
रामदास तडस यांचे येत्या लोकसभेसाठी (Loksabha Election) तिकीट कापले जाणार असून त्यांच्या जागी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांना उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना रामदास तडस यांनी हे वक्तव्य केलं.