“उद्धव ठाकरेंच्या सभेत जिवंतपणा होता पण अजित पवारांच्या सभेत…”, विजय वडेट्टीवारांचं टीकास्त्र

मुंबई | Vijay Wadettiwar – कालचा (27 ऑगस्ट) दिवस हा सभेचा ठरला. यामध्ये उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) सभा हिंगोलीमध्ये पार पडली, राज ठाकरेंची (Raj Thackeray) कोलाडमध्ये पार पडली तर अजित पवार (Ajit Pawar) यांची बीडमध्ये पार पडली. त्यामुळे रविवार हा रवि’वॉर’ ठरला. यावेळी तिन्ही नेत्यांनी आरोप-प्रत्यारोप केले. दरम्यान, याबाबत आता विरोधी पक्षाचे नेते विजय वडेट्टीवर (Vijay Wadettiwar) यांनी उद्धव ठाकरेंच्या सभेचं कौतुक करत अजित पवारांच्या सभेवर टीकास्त्र सोडलं आहे.
यावेळी विजय वडेट्टीवार म्हणाले की, काल हिंगोलीत झालेल्या उद्धव ठाकरेंच्या सभेत जिवंतपणा होता. पण बीडमध्ये सभेसाठी जबरदस्तीनं लोकं आणली होती. बीडमध्ये झालेल्या अजित पवारांच्या सभेत मुडदाडपणा होता. त्यांच्या सभेत लोकांना बसण्याची इच्छा देखील नव्हती.
सांगणार काय, बेईमानी केली असं सांगणार? की पक्ष फोडला म्हणून सांगणार? कशासाठी गेले हे सांगणार? सगळं दिसत आहे. त्यामुळे लोकं तुमच्यावर विश्वास ठेवायला तयार नाहीत. यांच्या सभांना काहीही अर्थ राहणार नाहीये. यांची जिरवायची असा निर्णय जनतेनं घेतला आहे, अशी टीकाही विजय वड्डेटीवारांनी अजित पवारांवर केली.