Top 5क्रीडाताज्या बातम्यादेश - विदेश

भारताचा पाकिस्तानला 5 गडी राखून विजय! जडेजा आणि पंड्याची जबरदस्त कामगिरी

दुबई (INDvsPAK, Asia Cup 2022, INDIA DEFEATED PAKISTAN) : आशिया चषकातील (Asia Cup 2022) दुसऱ्या सामन्यात भारतानं कट्टर प्रतिस्पर्धी आणि जगाचं लक्ष लागून असलेल्या हायहोल्टेज सामन्यात पाकिस्तानला धुळ चारत 5 विकेट्स राखून विजय मिळवला. (India Won By 5 vickets)

प्रथम फलंदाजी करणाऱ्या पाकिस्तानच्या संघानं भारतासमोर 20 षटकांत 148 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. या धावांचा सामना करताना भारतीय संघानं हे लक्ष्य 19.4 षटकांत पूर्ण करत हा विजय संपादन केला.

सामन्यात भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने गोलंदाजी आणि फलंदाजीतही आपली छाप दाखवून दिली. त्याने गोलंदाजीमध्ये तीन गडी बाद करून पाकिस्तानच्या संघाला 148 धावांवर रोखलं. तर रविंद्र जडेजाच्या साथीने फलंदाजीत पंड्याने चार चौकार आणि एक षटकार लगावत ३३ धावा करत शेवटच्या छटकारने भारतींच्या चेहर्‍यावर हास्य उमटावलं.

भारतीय फलंदाजांची कामगिरी

पहिल्याच षटकात के एल राहुल शून्यावर बाद झाला होता. मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात कॅप्टन रोहित शर्मा १८ चेंडूत (१२) धावा करत मोठ्या खेळीची अपेक्षा असताना मोठी कामगिरी करू शकला नाही. विराट कोहलीनं संघाची जबाबदारी स्वीकारत ३४ चेंडूंमध्ये तीन चौकार अन् एक षटकार ठोकत ३५ धावा केल्या. सूर्यकुमार यादवने १८ चेंडूमध्ये १८ धावा केल्या. रविंद्र जडेजाने २९ चेंडूत २ षटकार आणि २ चौकार ठोकत (३५) धावा केल्या तर, हार्दिक पंड्याने अवघ्या १७ चेंडूत ४ चौकार आणि एका विजयाच्या षटकाराने ते आजचा सामनावीर ठरला.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये