“राऊतांचं 10 मिनिटं संरक्षण काढा, ते परत…”, भर अधिवेशनात नितेश राणेंचा इशारा

मुंबई | Nitesh Rane On Sanjay Raut – ‘डुप्लिकेट शिवसेनेचं (Shivsena) हे विधीमंडळ नसून चोरमंडळ आहे’, असं वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं आहे. राऊतांनी केलेल्या या वक्तव्यावरुन आज (1 मार्च) अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या (Maharashtra Budget Session) तिसऱ्या दिवशी सभागृहात मोठा गदारोळ झाला. तसंच त्यांच्यावर भाजप आणि शिंदे गटाच्या नेत्यांकडून सडकून टीका केली जात आहे. यामध्ये भाजप (BJP) आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी संजय राऊतांवर हल्लाबोल केला आहे.
नितेश राणे यांनी भर अधिवेशनात अध्यक्षांसमोर “राऊतांचं 10 मिनिटं संरक्षण काढा, ते परत दिसणार नाहीत”, असं वक्तव्य केलं आहे. ते आज राऊतांनी विधिमंडळावर केलेल्या वक्तव्याचा निषेध करताना सभागृहात बोलत होते.
संजय राऊतांचा एकेरी उल्लेख करत नितेश राणे म्हणाले की, “संजय राऊतांचं आपल्याला रोज सकाळी ऐकावं लागतं. महाराष्ट्राला याची गरज आहे का? त्यांचं आपण काय घेऊन खाल्लं आहे. शिवसेनेचा आणि राऊतांचा काय संबंध आहे. ते सामनात येण्याअगोदर त्यांचे सर्व लेख शिवसेनेच्या विरोधातले होते. त्यावेळी त्यांची एवढी हिंमत झालेली की, हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विरोधात त्यांनी लिहिलं. शिवसेनेच्या विरोधात लिहिलं.”
“राऊतांनी मार्मिकमध्ये छापलेलं कार्टून बघा. देशाचे गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याबद्दल असं छापू शकतात का? त्यांना शिव्या देऊ शकतात का? संजय राऊतांचं 10 मिनिटं संरक्षण काढा, ते उद्या सकाळी परत दिसणार नाहीत, एवढा शब्द देतो,” असा इशारा नितेश राणेंनी दिला आहे.