पिंपरी चिंचवडशिक्षण

इतरांसाठी जगणारे खरे जीवन जगतात : महाजन

चिंचवड : समाजाला जास्तीत जास्त योगदान देण्याचा विचार करणार्‍या माणसाचे जीवन कृतार्थ ठरते, असे मत नामवंत व्याख्याते व दीपस्तंभ फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष यजुवेंद्र महाजन यांनी व्यक्त केले.

पिंपरी – चिंचवडमधील विद्यार्थी सहयोग संस्थेने संत तुकारामनगर येथे स्व. संदीप वसंतराव शेवडे स्मृतिदिनानिमित्त महाजन यांचे ‘यथार्थ जीवन, कृतार्थ जीवन’ या विषयावरील व्याख्यान आयोजित केले होते. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे प्रांतप्रमुख प्रा. प्रशांत साठे, कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे विश्वस्त प्रा. एन. डी. पाटील, इंद्रायणी को-ऑप बँकेचे संस्थापक अ‍ॅड. एस. बी. चांडक, विद्यार्थी सहयोग संस्थेचे अध्यक्ष दीपक पांचाळ, महापालिकेचे सह शहर अभियंता संजय कुलकर्णी, माजी नगरसेवक वसंतराव शेवडे, संदीप शेवडे यांची कन्या वैष्णवी शेवडे आदी उपस्थित होते.

महाजन म्हणाले, स्वतःसाठी जगणारे मृत असतात. इतरांसाठी जगणारे हे खरे जीवन जगतात. स्वामी विवेकानंदांच्या म्हणण्यानुसार आपण प्रत्येकजण महान कार्यासाठी जन्माला आलो आहोत. आपले जीवन कृतार्थ ठरविण्यासाठी आपण स्वप्न पाहिले पाहिजे, ध्येय ठरविले पाहिजे आणि ते ध्येय प्रत्यक्षात आणण्यासाठी स्वतःला झोकून देऊन प्रयत्न केले पाहिजेत. अखिल मानव जातीच्या, समस्त विश्वाच्या कल्याणाचा विचार करतो, तो महान जीवन जगतो.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये