पिंपरी चिंचवडराष्ट्रसंचार कनेक्टसिटी अपडेट्स

करवसुलीचे शलाका पथकाला काम

स्थायी समितीची बैठक

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेचा करआकारणी आणि करसंकलन विभाग करवसुलीसाठी सातत्याने नव-नवीन प्रयोग करीत असल्याने तिजोरीत मोठ्या प्रमाणात कर जमा होत आहे. आता करसंकलनाचे काम तृतीयपंथीयांच्या शलाका पथक (बचत गटाला) दिले आहे. या गटाला प्रोत्साहन रक्कम देण्यात येणार असून या विषयाला झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत प्रशासक व आयुक्त राजेश पाटील यांनी मान्यता दिली आहे.

हा निर्णय अतिशय क्रांतिकारी असून तीन महिन्यांसाठी प्रायोगिक तत्त्वावर तृतीयपंथीयांच्या शलाका पथकाला हे काम देण्यात आले आहे. या पथकाचे काम पाहून तीन महिन्यांनंतर पुढील निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती विभागप्रमुख नीलेश देशमुख यांनी दिली. पिंपरी-चिंचवड शहरात ५ लाख ७७ हजार मिळकतींची नोंद आहे. मालमत्ताधारकांनी चार महिन्यांत सुमारे तीनशे कोटी रुपयांचा कराचा भरणा केला आहे.

तृतीयपंथीयांसाठी ‘या’ त्रिसूत्रीचा महापालिकेकडून अवलंब : देशमुख

तृतीयपंथी (संरक्षण कायदा २०१९) देशाच्या संसदेने मंजूर केला आहे. मात्र, २०१३ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने तृतीयपंथीयांच्या हक्कांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय दिला होता. याचअनुषंगाने तृतीयपंथी संरक्षण कायदा हे बिल २०१४ मध्ये तत्कालीन तमिळनाडूचे डीएमके या पक्षाचे खासदार तिरूची सिवा यांनी राज्यसभेत खासगी विधेयक मांडले होते. हे विधेयक २०१५ मध्ये राज्यसभेत मंजूर झाले होते. त्यानंतर केंद्र सरकारने या विषयाला अनुसरून स्वत:चे विधेयक आणले. या विधेयकावर सविस्तर चर्चा झाल्यानंतर ५ ऑगस्ट २०१९ रोजी हे विधेयक आवाजी मतदानाने मंजूर झाले.

याबाबत माहिती देताना करआकारणी व करसंकलन विभागाचे सहायक आयुक्त नीलेश देशमुख म्हणाले, समाजातील वंचित, दुर्लक्षित घटकांना सामावून घेऊन त्यांचे सबलीकरण करण्यासाठी महापालिकेच्या वतीने विविध उपक्रम राबविले जात आहेत. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त महापालिकेने तृतीयपंथी पुनर्वसन कार्यक्रम हाती घेतला आहे.

अशी असणार प्रोत्साहन रक्कम

-१ कोटीपर्यंत – १ टक्के
-१ ते ५ कोटींपर्यंत-०.७५ टक्के
-५ कोटींच्या पुढे- ०.५० टक्के

Related Articles

Leave a Reply

Check Also
Close
Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये