ताज्या बातम्यापुणे

विशिष्ठ रुग्णांना मिळणार मोफत डायलिसीस सेवा; रोटरी क्लब ऑफ पुणे कात्रजचा भव्य प्रकल्प

चिंचवड | वरदान डायलिसीस सेंटर- एक भव्य सेवा प्रकल्प रोटरी क्लब ऑफ पुणे कात्रज आणि लोकमान्य मेडिकल फाउंडेशनचे उद्घाटन व लोकार्पण सोहळा नुकताच पार पडला. लोकमान्य हॉस्पिटल चिंचवड येथे झालेल्या या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे डॉ. अनिल परमार त्याचप्रमाणे काशिनाथ कुलकर्णी हे उपस्थित होते. रोटरी क्लब ऑफ पुणे कात्रज सेवा प्रकल्पचे संचालक रो विवेक कुलकर्णी आणि विशेष सेवा प्रकल्प संचालक रो नितीन भैय्यासाहेब नाईक यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. यावेळी प्रकल्पाचे पूर्ण अंतर्गत सजावट, सर्व लोगो, कलात्मक डिझाईन चे काम आर्किटेक्ट पिनाक नाईक यांनी अतिशय सुंदरप्रकारे पार पाडले.

या प्रकल्पाद्वारे रुग्णांना ५०० रुपयांमध्ये मध्ये अथवा विशिष्ठ रुग्णांना ही डायलिसीस सेवा मोफत मिळणार आहे. दरमहा जवळपास ५०० रुग्णांना या सेवेचा लाभ मिळणार आहे. सुमारे ५१ लाख रुपयांचा हा सेवा प्रकल्प रोटरी क्लब ऑफ पुणे कात्रज द्वारे लोकसेवेत रुजू झाला आहे. अशा उपक्रमांमुळे येणाऱ्या पुढील काळात रुग्णसेवेचा एक मापदंड प्रस्थापित करण्याचे कार्य पार पडणार आहेत. या प्रकल्पाद्वारे गरजू रुग्णांना पिंपरी चिंचवड परिसरात या सेवेचा लाभ घेता येऊ शकणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये