विनायक मेटेंच्या पत्नीला मंत्रिमंडळ विस्तारात स्थान देण्याची मागणी, खातंही निश्चित!

पुणे : (Rupali Patil On Eknath Shinde) काही दिवसांपुर्वी शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांचे मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील अपघातात निधन झाले. सध्या मेटेंचा अपघात झाला की, घातपात यावर अनेक दावे केले जात आहेत. मात्र, राष्ट्रवादीकडून विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटेंनी विधान परिषदेवर घेऊन मुख्यमंत्री शिंदेंनी मंत्रीमंडळात स्थान द्यावे अशी मागणी रुपाली पाटील यांनी केली आहे.
दरम्यान, विनायक मेटेंनी पाच वेळा विधानपरिषदेची आमदारकी भूषवली असून त्यांचे महाराष्ट्राच्या राजकारण आणि समाजकारणात असलेलं योगदान खूप मोठे आहे. मराठा आरक्षणासाठी शेवटपर्यंत त्यांनी संघर्ष केला आहे त्यामुळे त्यांच्या पत्नीचा राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीत समावेश करावा असं राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी असं सूचित केले आहे.
ज्योती मेटे यांना ‘महिला व बालकल्याण मंत्रालय व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद देऊन त्यांना न्याय द्यावा’ अशी मागणी रुपाली पाटील यांनी केली आहे. मेटे यांच्या निधनाने शिवसंग्राम परिवार कोलमडला आहे. एक महिला कार्यकर्ता म्हणून ही माझी मागणी आहे, असं रुपाली पाटील म्हणाल्या आहेत.