Top 5ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

सभेमधील आडव्या प्रश्नाने कल्याणराव हैराण

पंढरपूर : सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या (Sahakar Shiromani Vasanrao kale ssk ltd election) निवडणुकीच्या प्रचारार्थ गावोगावी फिरणारे चेअरमन कल्याणराव काळे (Kalyanrao Kale, Pandharpur) यांना आता सभासदांच्या आडव्या प्रश्नांना उत्तरे द्यावी लागत आहेत. अनेक ठिकाणी त्यांच्या सभ्य आणि शांत – संयमी स्वभावाने ते सभासदांची समजूत काढतात. परंतु काही गावांमध्ये जमलेल्या गर्दीतून अचानकपणे काही सभासद उठतात आणि उसाचे बिल, सिताराम कारखान्याच्या शेअर ची रक्कम, ट्रान्सपोर्टचे बिल अशा काही प्रश्नांनी ते सभेतील वातावरण बिघडवत असल्याचे दिसून येते.

कल्याणराव काळे यांना गेल्या अनेक वर्षांपासून या प्रश्नांचा सामना करावा लागत आहे, परंतु प्रत्यक्षात ते कधीही जनतेमध्ये जाऊन याचे उत्तरे देऊ शकले नाहीत. किंबहुना तशी परिस्थिती कधी आली नाही. परंतु या निवडणुकीमुळे त्यांना आता गावोगावी फिरावे लागत आहे आणि ज्यांच्यापासून तोंड लपवले अशा सभासदांना सामोरे जावे लागत आहे.

या सभासदांच्या पैकी काही अति अडचणी मधील किंवा खरोखर ज्यांच्या वरती आर्थिक आरिष्ट कोसळले आहे असे सभासद आपल्या वेदनांना वाट मोकळी करून देताना दिसत आहेत. त्यामुळे भर सभेत औचित्याचे भान न ठेवता सभासद कल्याणराव काळे यांना प्रश्न विचारत असल्याचे दिसते.

त्यावेळी संबंधित गावातील स्थानिक पुढारी यांना शांत बसवतात आणि वातावरण निवलून सभा पुढे चालू राहते . विशेषत: आता सोशल मीडिया च्या जमान्यांमध्ये जो तो मोबाईल वरून शूटिंग करतो आणि असा काही वादविवाद चा प्रसंग उद्भवला तर लगेचच काही लोक मोबाईल काढून त्याचे शूटिंग करतात त्यांनाही समर्थकांना आवरावे लागते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये