“संभाजी गुन्हा एकदाच माफ करतो नंतर गुन्हेगार…”; संभाजीराजे छत्रपतींचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल!

मुंबई – Sambhajiraje Chhatrapati Viral Video | राज्यसभा निवडणुकीच्या (Rajya Sabha Elections 2022) सहा जागांपैकी सहावी जागा अपक्ष लढवणार असल्याचं संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati Viral Video) यांनी जाहीर केलं होतं. यासाठी त्यांनी सर्व पक्षीय नेत्यांना सहकार्याचं आवाहनही केलं होतं. मात्र यावरून आता राजकारण रंगताना दिसत आहे. शिवसेनेने (Shivsena) संभाजीराजे यांना अपक्ष म्हणून पाठिंबा नाकारला. यामुळे राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.
शिवसेनेने कोल्हापूरच्या (Kolhapur) संजय पवार (Sanjay Pawar) यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर केली, त्यामुळे संभाजीराजेंची कोंडी झाली. आता पत्रकार परिषद घेत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आणि त्यांनी सर्व घटनाक्रम सांगितला. संभाजीराजेंनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली आहे.
सध्या सोशल मीडियावर संभाजीराजेंच्या समर्थकांनी एक व्हिडीओ व्हायरल केला आहे. त्यामधून कोणत्या तरी राजकीय पक्षाला इशारा असल्याच्या चर्चा आहेत. या व्हिडीओमध्ये संभाजीराजे यांचे रायगडावरील फोटो असून त्यासोबत, ‘शिवाजी महाराजांसारखा राजा कधीच कोणो एकाचा नसतो. संभाजीला समजून घेण्यासाठी तुम्हाला काळीज शिवाजीचं करून घ्यावं लागेल. कारण संभाजी गुन्हा एकदाच माफ करतो नंतर गुन्हेगार साफ करतो,असा डायलॉगही ऐकायला मिळत आहे.