फॅशनला पूरक ‘संपूर्णम कलेक्शन’

स्टार्टअप | हर्षल बाभुळगावकर, कीर्ती ब्राम्हे |
ट्रेंडनुसार वावरायला सगळ्यांनाच आवडतं. मात्र, सगळंच काही जागेवर मिळेल असं होत नाही. मध्यमवर्गातल्या महिलांना तर अनेकदा ट्रेंडनुसार कपडे मिळतात. मात्र, त्यावर मॅचिंग बॅग, पर्स मात्र मिळणं अवघड होऊन जातं. त्यावर आता पुण्यातल्या हर्षल बाभुळगावकर आणि कीर्ती ब्राम्हे यांनी एकदम झक्कास पर्याय समोर आणला आहे.
‘संपूर्णम कलेक्शन‘ नावाचा कस्टमाईज् बॅग्स आणि पर्सचा ब्रांड समोर आणला आहे. संपूर्ण क्रिएटीव्हीटी पानाला लावत विविध आणि हव्या तशा पर्स, बॅग्स, ट्रेंडनुसार ड्रेस देखील ‘संपूर्णम कलेक्शन’मध्ये तयार केले जातात तेही कोणत्याही फॅब्रिकमध्ये.
मुळात हर्षल आणि कीर्ती यांनी कोरोना काळात मास्क तयार करण्यापासून या कामाला सुरुवात केली होती. ३० हजार पेक्षा जास्त मस्क त्यांनी त्या काळात तयार केले. तेही वेगवेगळ्या कापडाचे. कोरोना काळातून बाहेर पडल्यानंतर त्यांनी मार्केटचा चांगला अभ्यास केला आणि पर्स, बॅग्स ट्रेंड्सनुसार तयार करायालं सुरुवात केली.
बटव्यापासून ट्रॅव्हल बॅग्स पर्यंत आता ‘संपूर्णम कलेक्शन’ कडून ऑर्डर स्वीकारल्या जातात. आजवर अनेक कंपन्यांनी एखाद्या स्पेसिफिक प्रकारची बॅग बनवून त्यावर त्यांच्या कंपनीचे लोगो लावून घेण्यासाठी ‘संपूर्णम कलेक्शन’ला ऑर्डर दिलेल्या आहेत. सध्या मोठ्या प्रमाणात लोक त्यांना ‘संपूर्णम कलेक्शन’च्या फेसबुक आणि इन्स्टाग्रामवरून पेज वरून ऑर्डर करतात. त्याचबरोबर ‘संपूर्णम कलेक्शन’चे पुण्यात शुक्रवार पेठेत शॉप देखील सुरु आहे.