शिवसेना घेणार मुरजी पटेलांवर आक्षेप! भाजपचं टेन्शन वाढलं?

मुंबई : (Sandeep Naik On Murji Patel) अंधेरी पुर्व पोटनिवडणूकीच्या निमित्ताने राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतूजा लटके यांना उमेदवारी दिली आहे, तर भाजपने मुरजी पटेल यांनी निवडणूकीच्या रिंगणात उतरवले आहे. शुक्रवार दि. 14 रोजी दोन्ही गटाकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करुन उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत.
दरम्यान, त्यानंतर आता शिवसेनेने भाजप उमेदवार यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे रितसर आक्षेप घेण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. मुरजी पटेल यांच्यावर काही गुन्हे दाखल आहेत. शिवाय खोटं जात पडताळणी प्रमाणपत्र दाखल केल्याने त्यांचं नगरसेवक पदही रद्द झालेलं आहे. याच मुद्द्यांच्या आधारे संदीप नाईक आक्षेप दाखल करणार असल्याचं समजतं. आक्षेप दाखल केल्यानंतर निवडणूक आयोग काय निर्णय घेणार, हे पाहाणं महत्त्वाचं आहे.
अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीमध्ये मुख्य लढत ही भाजप आणि ठाकरे गटामध्ये होतेय. ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके या आहेत. तर शिंदे गटाचे उमेदवार मुरजी पटेल हे आहेत. मुरजी पटेल यांच्यावर ठाकरे गटाचे माजी नगरसेवक संदीप नाईक हे रितसर आक्षेप घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे.