दावोसला जाण्यापेक्षा गुजरातला जा… राऊतांचा मुख्यमंत्री शिंदेंना टोला

मुंबई | संजय राऊत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल दावोसच्या दौऱ्यावर होते. त्या दौऱ्यावर असताना दावोसमधून महाराष्ट्र राज्यासाठी मोठी गुंतवणूक आणणार असल्याच यावेळी मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. परंतु राज्यातून मोठमोठे प्रकल्प गुजरातमध्ये जात असताना शिंदेंच्या या वक्तव्यामुळे राउतांनी त्यांना चांगलाच टोला लगावलाय. तुमच्या नाकासमोर राज्यातील प्रकल्प गुजरातला पळवले, त्यामुळे राज्याचं मोठं नुकसान झालंय. त्यामुळे गुंतवणूक गेली आणि रोजगारही गेले आहेत. त्यामुळे दावोसला जाण्याआधी गुजरातला जा, असा टोला खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला आहे.
दावोसमधून काही येईल कि नाही माहिती नाही पण तुमच्या नाकासमोरून जे प्रकल्प गुजरातला गेलेत ते परत आणा. दावोसचे करार कसे होतात हे आम्हालाही माहीत आहे. तिकडे जगभरातून राज्यकर्ते येतात, आपले करार करतात. मग तुम्ही सांगता पाच लाख कोटीचे करार झाले, दहा लाख कोटींचे करार झाले पण आतापर्यंत राज्यकर्त्यांनी दावोसला जाऊन किती कोटीचे करार केले ते अजून सिद्ध करू शकले नाही, असा दावा राऊत यांनी केला.
पुढे संजय राऊत म्हणतात… फॉक्सकॉन वेदांत, एअरबस, ड्रग्स पार्क सारखे मोठे प्रकल्प गेले. दोन लाख कोटीच्यावरची गुंतवणूक तुमच्या नाकाखालून गुजरात आणि इतर राज्य घेऊन गेले. ते आधी महाराष्ट्रात घेऊन या. असा हल्ला राउतांनी शिंदेंवर चढवला.